मुंबई - दिवाळीपासून बेमुदत संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने मोठा दणका देत 11 हजार कंत्राटी नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला ( Contract Staff will appoint In MSRTC ) आहे. तसेच आजपर्यंत कामावर हजर झाले नाहीत अशा कामगारांवर नियमानुसार निलंबन, बडतर्फ तसेच सेवा समाप्तीची कारवाई करण्यावर मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याचे परिवहन मंत्री अनिल परब ( Transport Minister Anil Parab ) यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांना 31 मार्चपर्यंत हजर होण्याची दिली होती मुदत - विलीनीकरणासहित विविध प्रलंबित 18 मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संपावर गेले ( ST Workers Strike ) आहेत. तसेच आझाद मैदानात गेले पाच महीने ठाण मांडून आहेत. संपाचा तिढा सोडवण्यासाठी परिवहन विभागाने सातत्याने प्रयत्न केले. परिवहन मंत्री अनिल परब यांनीही सतत आवाहन केले. परंतु, कर्मचारी ठाम आहेत. परिणामी ग्रामीण भागातील जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर विधिमंडळाने 31 तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे निर्देश दिले होते. मुदतीचा आज शेवटचा होता. मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत चर्चा करून कामगारांवर कारवाईचा निर्णय घेण्यात आल्याचे परिवहन मंत्री परब म्हणाले.
उद्यापासून कारवाईचा बडगा - सध्या पाच हजार बसेस धावत आहेत. कंत्राटी कर्मचारी भरती केल्यास आठ हजार आसपास बसेस रस्त्यावर धावतील. आज कर्मचाऱ्यांना हजर राहण्याची मुभा संपत आहे. आज संध्याकाळपर्यंत किती कर्मचारी हजर झाले याचा अहवाल प्राप्त होईल. जे कर्मचारी हजर होतील, त्यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नाही. मात्र, उद्यापासून (दि. 1 एप्रिल) कारवाईचा बडगा उगारला जाईल. आतापर्यंत सात वेळा कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे. कर्मचारी सरकारचे आदेश झुगारून लावत आहेत. याचा अर्थ त्या कर्मचाऱ्यांना नोकरीची गरज नाही. त्यामुळे त्यांच्यावर नियमानुसार निलंबन, बडतर्फी किंवा सेवा समाप्तीची कारवाई केली जाईल, असे परब यांनी सांगितले.
लवकरच 11 हजार कंत्राटी कर्मचारी भरती - सुमारे 11 हजार कंत्राटी चालक व वाहकांची भरती लवकरच करणार असल्याचेही मंत्री परब यांनी ( Contract Staff will appoint In MSRTC ) सांगितले. याबाबत तयारी झाली असून लवकरच निविदा देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. सर्व मार्ग निश्चित झाल्याची माहितीही परब यांनी दिली.