मुंबई - राज्याची शासकीय रेखाकला श्रेणी परीक्षा अर्थात इंटरमिजीएट चित्रकला परीक्षा पुढे ढकलत ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. या परीक्षेबाबत नुकतीच मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी समाधान व्यक्त केले. मात्र, नोंदणी केलेल्या ११ हजार विद्यार्थ्यांना आपले शुल्क किती आणि कसे मिळणार असा प्रश्न पडला आहे.
शुल्क परत देण्याचे आदेश -
महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाने २२ व २३ फेब्रुवारीला ऑनलाईन पद्धतीने इंटरमिजिएट परीक्षा घेण्याचे जाहीर केले होते. या परीक्षेसाठी २०० रुपये शुल्क आकारले होते. परंतु परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यास राज्यातील कला शिक्षक, महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ व शिक्षक भारतीकडून विरोध करण्यात आला होता. इंटरमिजिएट परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेणे शक्य नाही. ही परीक्षा ऑफलाईनच घेण्यात यावी,तसेच वाढीव शुल्क रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाने महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष श्रीहरी झिरवाळे यांची भेट घेतली. त्यांनी तातडीने केलेल्या कारवाईमुळे मंत्री उदय सामंत यांनी तातडीची बैठक घेत परीक्षा ऑफलाईन घेण्याचा तसेच नोंदणी केलेल्या ११ हजार विद्यार्थ्यांचे शुल्क परत देण्याचे आदेश दिले.त्यामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी आनंद व्यक्त केला. मात्र आपण भरलेले २२० रुपये शुल्कापैकी किती आणि कसे शुल्क मिळणार असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.
महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाने याबाबत पाठपुरावा
महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाने याबाबत पाठपुरावा केला असता विद्यार्थ्यांना लवकरच शुल्क परत करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाकडे सांगण्यात आले. तसेच भरलेल्या शुल्कातून जीएसटी व काही चार्जेस वगळून उर्वरित रक्कम विद्यार्थ्यांना परत केली जाईल. ही रक्कम विद्यार्थ्यांनी ज्या बँक खात्यातून शुल्क भरले आहे. त्या खात्यामध्ये ऑनलाईन माध्यमातून वळती करण्यात येणात असल्याचे संचालनालायकडून स्पष्ट करण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाच्या उपनगर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रकाशचंद्र मिश्रा यांनी सांगितले.
रेखाकला परीक्षा होणार ऑफलाइन ; ११ हजार विद्यार्थ्यांना शुल्क परत मिळणार!
मंत्री उदय सामंत यांनी तातडीची बैठक घेत परीक्षा ऑफलाईन घेण्याचा तसेच नोंदणी केलेल्या ११ हजार विद्यार्थ्यांचे शुल्क परत देण्याचे आदेश दिले.त्यामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी आनंद व्यक्त केला. मात्र आपण भरलेले २२० रुपये शुल्कापैकी किती आणि कसे शुल्क मिळणार असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.