ETV Bharat / city

युतीच्या नेत्यांना 'या' गोष्टीची वाटतेय भिती?...म्हणूनच दडवला जातोय जागा वाटपाचा फॉर्म्युला! - shivsena news

कोल्हापूर, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नागपूर, पुणे या जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात युतीत बंडखोरी होण्याची शक्यता आहे. तशा जोरदार हालचाली होताना दिसत आहेत. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी किती बंडोबाना थंडोबा करण्यात युतीच्या नेत्यांना यश येते यावर पुढील गणिते अवलंबून असेल.

युती
author img

By

Published : Oct 1, 2019, 1:29 PM IST

मुंबई - शिवसेना भाजप युतीची घोषणा तर झाली, पण कोण किती जागा लढणार? कोणाच्या वाट्याला कोणत्या जागा आल्या? त्याचा फॉर्म्युला अजूनही समोर आलेला नाही. यामागचे मुख्य कारण म्हणजे, शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांना वाटत असलेली बंडखोरीची भीती. त्याची झलकही संपूर्ण महाराष्ट्रात पहायला मिळत आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाले आहे. जागा वाटपानंतर आता मोठ्या प्रमाणात आऊटगोईंगही होऊ शकते, याचीही भीती दोन्ही पक्षांना वाटते.

हेही वाचा - सातारा लोकसभेचा आखाडा रंगणार.. उदयनराजेंच्या विरोधात राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील

शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षात उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुकांची संख्या मोठी आहे. भाजपच्या मतदारसंघावर शिवसेनेने तर शिवसेनेच्या मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे. त्यामुळे गुंतागुंत वाढली आहे. त्यात कोणता मतदारसंघ कोणाला हे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी गुलदस्त्यात ठेऊन इच्छुकांना गोंधळात टाकले आहे. पण, तरीही जी भीती आहे ती अजूनही टळलेली नाही.

हेही वाचा - मुख्यंमत्री फडणवीस यांना 'सर्वोच्च' झटका, प्रलंबित गुन्ह्यांची माहिती प्रकरणी खटला पुन्हा चालणार

अनेक जण बंडाच्या तयारीत?

वडाळा मतदारसंघ

मुंबईतील वडाळा मतदारसंघ हा युतीमध्ये भाजपच्या वाट्याला गेला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या माजी महापौर श्रद्धा जाधव नाराज झाल्या आहेत. आपली नाराजी दाखवण्यासाठी त्या मातोश्रीवरही धडकल्या होत्या. त्या या मतदारसंघात बंडाच्या तयारीत आहेत.

मागाठाणे मतदारसंघ

मुंबईच्या मागाठाणेची जागा शिवसेनेला गेली आहे. त्यामुळे येथून इच्छुक असलेले भाजपचे प्रविण दरेकर यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. या नाराजीचा फटका शिवसेनेच्या प्रकाश सुर्वेंना बसू शकतो. सुर्वे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले असता त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे वातावरण तणावाचे झाले होते.

नवी मुंबई

नवी मुंबईतील बेलापूर आणि ऐरोली हे दोन्ही मतदासंघ भाजपला गेल्याने येथील स्थानिक नेतृत्व नाराज झाले आहे. नवी मुंबई शहर प्रमुख विजय माने यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. ते बेलापूर मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. शिवाय बेलापूरच्या विद्यमान भाजप आमदार मंदा म्हात्रे पुन्हा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. जर इथे पक्षाने गणेश नाईक यांना उमेदवारी दिल्यास इथेही पक्षांतर्गत बंडखोरीला सामोरे जावे लागणार आहे.

ठाणे

ठाणे शहर मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला आहे. इथे भाजपचे संजय केळकर हे विद्यमान आमदार आहेत. ही जागा शिवसेनेने लढवावी अशी जोरदार मागणी आहे. मात्र, केळकर उमेदवार असतील तर तिथ शिवसेनेकडून शंभर टक्के बंडखोरी केली जाऊ शकते. त्या तयारीत इच्छुक आहेत.

कल्याण

कल्याण पश्चिम मतदासंघाबाबतही तीच स्थिती आहे. ही जागा सध्या भाजपकडे आहे. मात्र, ती जागा कोणत्याही स्थितीत शिवसेनेला मिळावी यासाठी स्थानिक नेते आग्रही आहेत. ही जागा शिवसेनेला गेल्यास भाजपच्या नाराजीचा फटका शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे.

कोकण

गुहागर मतदासंघातून भास्कर जाधव हे शिवसेनेचे उमेदवार असतील. त्यामुळे राष्ट्रवादीनेही शिवसेनेचे जिल्हापरिषद सदस्य सहदेव बेटकर यांना गळाला लावले आहे. त्यामुळे जाधव यांच्या विरोधात एक माजी शिवसैनिक लढणार आहे. तर दापोलीमध्ये कदम विरूद्ध दळवी यांच्यातील वाद विकोपाला जाण्याची चिन्हे आहेत. त्याच फटका युतीलाच बसू शकतो.

पुणे

पुण्यातील कोथरूड मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इथून विद्यमान आमदार डॉ. मेधा कुलकर्णी यांचा भाजपकडून पत्ता कट केला जाणार आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी आहे. उमेदवार हा स्थानिक असावा, अशी मागणी होत आहे. इथून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील रिंगणात उतरणार आहे. ब्राह्मण महासंघाने त्यांच्या उमेदवारीलाही विरोध केला आहे. शिवाय स्थानिक उमेदवारच हवा अशी पोस्टर संपूर्ण मतदारसंघात लागले आहेत. त्यामुळे अंतर्गत नाराजीचा फटका पाटलांना बसू शकतो, अशी चर्च सर्वत्र आहे.

राज्यभरात सर्वत्र असेच चित्र

कोल्हापूर, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नागपूर, पुणे या जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात युतीत बंडखोरी होण्याची शक्यता आहे. तशा जोरदार हालचाली होताना दिसत आहेत. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी किती बंडोबाना थंडोबा करण्यात युतीच्या नेत्यांना यश येते यावर पुढील गणिते अवलंबून असतील.

हेही वाचा - विधानसभा निवडणूक 2019 : चार ऑक्टोबरला मुख्यमंत्री भरणार उमेदवारी अर्ज

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.