मुंबई - सायन परिसरात बुधवारी रात्री निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकाने 11 लाख 85 हजार संशयित रोख पकडली. याप्रकरणी पथकाने दयाराम हरीराम जैस्वाल, अजितकुमार बलराज शाह व अनुराग कुमार शाह यांना ताब्यात घेतले आहे.
सायन कोळीवाडा परिसरात 17 एप्रिलला बुधवार रात्री विधानसभा मतदार संघातील संजय नारायण वारंग यांचे फिरते तपासणी पथक गस्तीवर होते. यावेळी सायन हॉस्पीटल जवळील सिग्नलवर पाहणी करीत असताना, त्यांनी लाल रंगाच्या रेनॉल्ट डस्टर या मोटार कारची (एम.एच.47 ए.बी.6559) तपासणी केली. यावेळी गाडीमध्ये दयाराम हरीराम जैस्वाल, अजितकुमार बलराज शाह व अनुराग कुमार शाह हे तीन जण होते. त्यांच्याकडे 11 लाख 85 हजार रुपये रोख रक्कम आढळून आली. याबाबत आयकर विभागाला कळविण्यात आले असून आयकर विभागाचे उपायुक्त अधिक चौकशी करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.