ETV Bharat / city

OBC Reservation : ओबीसी आरक्षणासाठी निवडणूक आयोगाने कसली कंबर; 'या' तारखेपासून महाराष्ट्र दौरा - ओबीसी आरक्षण निवडणूक आयोग

सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court ) रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याची सूचना निवडणूक आयोगाला ( Election Comission ) दिली आहे. त्यानंतर आता ओबीसी समाजाची (OBC Reservation ) मते जाणून घेण्यासाठी आयोगाचा दौरा

Election Commission
Election Commission
author img

By

Published : May 13, 2022, 5:55 PM IST

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court ) रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याची सूचना निवडणूक आयोगाला ( Election Comission ) दिली आहे. त्यानंतर आता निवडणूक आयोग कामाला लागला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने राज्यातील ओबीसी समाजाची (OBC Reservation )मते जाणून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या २१ मे पासून समर्पित आयोगाचा दौरा करणार आहे. त्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, राज्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात येऊन मते मांडण्याचे आवाहन केले आहे.

महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती आणि शहरातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगर पंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास (इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती) आरक्षण देण्यासठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग गठीत केला आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्विकारण्यासाठी या समर्पित आयोगाने विभागवार कार्यक्रम जाहीर केला आहे.

या समर्पित आयोगाच्या भेटीच्या वेळी नागरिकांना आपली मते वेळेत मांडता यावीत आणि निवेदन देता यावेत, यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात आपल्या नावाची नोंदणी भेटीच्या दिनांकापूर्वी करावी. तसेच, यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन या समर्पित आयोगाचे सदस्य सचिव पंकज कुमार (भा.प्र.से.) यांनी केले आहे.

समर्पित आयोगाचा असा असेल दौरा -

1. शनिवार दि. २१ मे २०२२ रोजी सकाळी ९.३० ते सकाळी ११.३० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे भेट देतील.

2. रविवार दि. २२ मे २०२२ रोजी सकाळी ९.३० ते सकाळी ११.३० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद तर याच दिवशी सायंकाळी ५.३० ते सायंकाळी ७.३० पर्यंत विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे भेट देणार आहेत.

3. बुधवार दि. २५ मे २०२२ रोजी दुपारी २.३० ते दुपारी ४.३० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण भवन येथे भेट देतील.

4. शनिवार दि. २८ मे २०२२ रोजी सकाळी ९.३० ते सकाळी ११.३० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती तर याच दिवशी सायंकाळी ४.३० ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर येथे भेट देतील.

हेही वाचा - Mns Vs Shivsena : 'अटी शर्ती फक्त राज ठाकरेंसाठीच का?', मुख्यमंत्र्यांच्या सभेवरुन मनसेचा सवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.