ETV Bharat / city

विधानपरिषदेच्या पाच नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली पदाची शपथ - आमदार सतीश चव्हाण

औरंगाबाद  विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले सतीश चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस), नागपूर  विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले अभिजित वंजारी  (काँग्रेस), पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले अरुण लाड (राष्ट्रवादी काँग्रेस) यांनी आमदारकीची शपथ घेतली. त्याचबरोबर पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले जयंत आसगांवकर (काँग्रेस) आणि अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून विजयी झालेले किरण सरनाईक (अपक्ष) यांनी पदाची शपथ घेतली.

आमदारकीची शपथ
आमदारकीची शपथ
author img

By

Published : Dec 8, 2020, 8:19 PM IST

मुंबई - विधानपरिषदेच्या औरंगाबाद, नागपूर, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून आणि पुणे, अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषदेवर निर्वाचित झालेल्या ५ नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी विधानभवनात झाला. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी या पाच नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली.

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले सतीश चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस), नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले अभिजित वंजारी (काँग्रेस), पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले अरुण लाड (राष्ट्रवादी काँग्रेस) यांनी आमदारकीची शपथ घेतली. त्याचबरोबर पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले जयंत आसगांवकर (काँग्रेस) आणि अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून विजयी झालेले किरण सरनाईक (अपक्ष) यांनी पदाची शपथ घेतली.

हेही वाचा-'ही तर फक्त सुरुवात, पुढेही महाविकास आघाडी यश मिळवत राहील'

विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित या शपथविधी कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मंत्रीमंडळातील विविध विभागांचे मंत्री आणि राज्यमंत्री उपस्थित होते.

तीन पक्षांच्या शक्तीचे आकलन करण्यास चूक झाली -

विधानसभा निवडणुकीनंतर ही पहिली निवडणूक होती. त्यामुळे तीनही पक्षाच्या शक्तीचे आकलन करण्यास भाजपाकडून कुठे तरी चुक झाल्याची कबूली विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या निकालानंतर दिली होती. अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नसल्याचेही त्यांनी सांगितले. या पुढच्या काळात योग्य रणनिती आखून निवडणुकांना सामोरे जाऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.