ETV Bharat / city

Eknath Shinde : "माजी मुख्यमंत्रीही सोबत त्यामुळे..."; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया - एकनाथ शिंदे मुख्यमंत्री मराठी बातमी

मंत्रालयात जाऊन एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारला आहे. महाराष्ट्रातली प्रलंबित प्रश्न पुढे घेऊन जाणार आहे. रखडलेल्या प्रकल्पांना वेग देणार आहे. माजी मुख्यमंत्री सोबत असल्याने जोरदार बॅटिंग होईल, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी दिली आहे.

Eknath Shinde
Eknath Shinde
author img

By

Published : Jun 30, 2022, 9:25 PM IST

Updated : Jun 30, 2022, 10:09 PM IST

मुंबई - एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. तर, देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर मंत्रालयात जाऊन एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारला ( Eknath Shinde Take Charge Chief Minister ) आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या विकासकामांबाबत भाष्य केलं आहे. महाराष्ट्रातली प्रलंबित प्रश्न पुढे घेऊन जाणार आहे. रखडलेल्या प्रकल्पांना वेग देणार आहे. माजी मुख्यमंत्री सोबत असल्याने जोरदार बॅटिंग होईल. राज्याचा विकास हेचं आमचं उद्दिष्ठ असणार आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्यांच्यासोबत यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित होते.

शपथविधीवेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव घेतले. त्यानंतर त्यांनी पद आणि गोपीनीयतेची ईश्वरसाक्ष शपथ घेतली आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी बंड केलं होते. तेव्हा त्यांच्यावर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले होते. मात्र, भाजपने शिंदे शिंदेना मुख्यमंत्री करत मोठी खेळी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळे वळण मिळाले आहे.

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ बैठक सुरू. राज्यातील खरीप हंगाम, पाऊस -पाणी आणि पीकविमा याबाबत आढावा घेण्यात येत आहे. pic.twitter.com/kDjq3tEAlu

    — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 30, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

देवेंद्र फडणवीसांनी केलं ट्विट - उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी ट्विट केले आहे. "एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आदेशाचे मी पालन करतो. ज्या पक्षाने मला सर्वोच्च पद दिले, त्या पक्षाचा आदेश मला शिरोधार्य आहे," असे फडणवीसांनी म्हटलं आहे.

हेही वाचा - Eknath Shinde Maharashtra CM : महाराष्ट्राला मिळाले नवे 'ठाणे'दार; एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

Last Updated : Jun 30, 2022, 10:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.