मुंबई - खरी शिवसेना कोणाची हा वादावरील निर्णय प्रलंबित असताना शिंदेंनी शिवसेनेच्या नेते-उपनेत्यांच्या नियुक्त्या ( Shinde group leader and deputy leader appointments announced ) जाहीर केल्या आहेत. माजी मंत्री रामदास कदम,( Former minister Ramdas Kadam ) माजी खासदार आनंदराव अडसूळ, भावना गवळी यांच्यासह पाच जणांना शिवसेना नेतेपद तर तानाजी सावंत, शहाजी बापू पाटील, सदा सरवणकर, यशवंत जाधव, शीतल म्हात्रे, शरद पोंक्षे आदी २६ जणांवर उपनेते पदाची जबाबदारी दिली आहे.
बंडखोर शिंदें गटाकडून नेते-उपनेत्यांची नवी यादी जाहीर - खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा मजबूत व्हावा यासाठी एकनाथ शिंदे गट ( Chief Minister Eknath Shide ) दिवसेंदिवस अधिकाधिक आक्रमक होत आहे. दुसरीकडे शिवसेनेचे ( Shiv Sena ) प्रकरण न्यायालयात आहे. सर्वोच्च न्यायालयाने पाच न्यायाधिशांचे घटनापीठ नेमले आहे. यावर निर्णय प्रलंबित असताना बंडखोर शिंदें गटाकडून नेते-उपनेत्यांची नवी यादी जाहीर करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी या आधीही शिवसेना नेते-उपनेत्यांची यादी परस्पर जाहीर करत ठाकरेंना धक्का देण्याचा प्रयत्न केला होता. आता नव्याने यादी जाहीर करण्यात आली आहे.
शिवसेना नेते - रामदास कदम, आनंदराव अडसूळ, भावना गवळी, प्रताप जाधव, गुलाबराव पाटील
शिवसेना उपनेते - अनिल बाबर, दादाजी भुसे, गोपीकिसन बाजोरिया, श्रीरंग बारणे, ज्ञानराज चौगुले, शंभूराज देसाई, भरत गोगावले, यशवंत जाधव, अर्जुन खोतकर, दीपक केसरकर, शितल म्हात्रे, विजय नाहटा, चिमणराव पाटील, हेमंत पाटील, शहाजीबापू पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील, शरद पोंक्षे, रवींद्र फाटक, संजय राठोड, उदय सामंत, तानाजी सावंत, सदा सरवणकर, राहुल शेवाळे, विजय शिवतारे, कृपाल तुमाने, संध्या वाढवकर