मुंबई - उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यावर राज्याला एक पर्यायी सरकार देण्याची गरज होती. ती आम्ही देत आहे. एकनाथ शिंदे हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आज सायंकाळी साडेसात वाजता एकनाथ शिंदे म्हणून शपथ घेतील. आणखी कोही लोक आमच्या संपर्कात आहेत, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली ( Eknath Shinde Maharashtra New CM ) आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांसोबत न जाण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी सरकार देणं गरजेचं होतं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना विधीमंडळ गट, भाजप आणि 16 अपक्षांच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार आहे.
-
"Eknath Shinde to be the Maharashtra Chief Minister, oath ceremony to be held at 7.30pm today," BJP leader Devendra Fadnavis announces in a joint press conference with Shinde pic.twitter.com/PiXv1I5nkU
— ANI (@ANI) June 30, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">"Eknath Shinde to be the Maharashtra Chief Minister, oath ceremony to be held at 7.30pm today," BJP leader Devendra Fadnavis announces in a joint press conference with Shinde pic.twitter.com/PiXv1I5nkU
— ANI (@ANI) June 30, 2022"Eknath Shinde to be the Maharashtra Chief Minister, oath ceremony to be held at 7.30pm today," BJP leader Devendra Fadnavis announces in a joint press conference with Shinde pic.twitter.com/PiXv1I5nkU
— ANI (@ANI) June 30, 2022
मागील निवडणुकीत भाजप आणि शिवसेना बहुमत मिळाले होते. मात्र, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बहुमत झुगारले. तसेच, हिंदुत्वाच्या विरोधातील विचारधारा असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याची विचार केला. सरकार स्थापन झाल्यावर अडीच वर्षांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. सरकारमधील दोन मंत्री तुरुंगात गेले. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी दाऊदचा विरोध केला. दुसरीकडे त्याच्याशी संबंधित मंत्र्यांला मंत्रिपदावरुन काढण्यात आलं नाही, असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
हेही वाचा - Eknath Shinde Maharashtra CM : शिवसेना शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे यांचा थक्क करणारा प्रवास