मुंबई योग गुरु रामदेव बाबा यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थान नंदनवन येथे भेट घेतली. त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde हेच बाळासाहेबांचे खरे वारसदार True heir of Balasaheb आहेत. अस वक्तव्य करत योग गुरू रामदेवबाबांनी Yoga Guru Ramdev Baba शिंदेंवर स्तुतीसुमने उधळली आहेत. योग गुरु रामदेव बाबांनी हे वक्तव्य केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे रामदेव बाबांनी एकनाथ शिंदे यांना बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार म्हटल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
रामदेव बाबा काय म्हणाले मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना रामदेव बाबा म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी हे आमच्या हिंदू धर्माचे, सनातन धर्माचे गौरव पुरुष Glorious man आहेत. राजधर्मासोबतच सनातन धर्म, ऋषी धर्माला प्रामाणिकपणे ते निभावत आहेत. त्यांना आशिर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी मी इथे आलो होतो. कारण बाळासाहेब ठाकरे साहेबांसोबत आमचं आत्मीय प्रेम होतं. शिंदे हे बाळासाहेबांचे मानस, आध्यात्मिक आणि राजकीय वारसदार political heir आहेत. आम्ही त्यांच्यासोबत मोठ्या विषयांवर संवाद साधला. खूप बरं वाटलं. अशी प्रतिक्रिया रामदेव बाबा यांनी एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर व्यक्त केली.
काल घेतली होती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट एकीकडे ठाकरे गटाची शिवसेना Shiv Sena Thackeray group विरुद्ध शिंदे गट shinde group यांच्यातील वाद विकोपाला पोहोचला असताना, रामदेव बाबा यांनी कालच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis यांची शासकीय निवासस्थान सागर बंगल्यावर भेट घेतली होती. त्यानंतर लगेच आज त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांची मोठ्या प्रमाणात प्रशंसा केल्याने आता हा वाद विकोपाला जाऊ शकतो. विशेष करून रामदेव बाबा सारख्या योग गुरुने थेट एकनाथ शिंदे यांना बाळासाहेब ठाकरे यांचे उत्तराधिकारी म्हटल्याने उद्धव ठाकरे यांच्या गटात कमालीची नाराजी पसरली आहे.