मुंबई - शिवसेनेवर आपला ताबा राहवा यासाठी एकनाथ शिंदे गटाकडून आता महत्त्वाच्या हालचाली करायला सुरुवात झाली आहे. शिवसेनेची ओळख असलेली त्यांची निशाणी धनुष्यबाण (bow and arrow symbol) याच्यावरच आता एकनाथ शिंदे गटाकडून दावा करण्यात आला आहे. मूळ शिवसेना आपणच असून शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण हे आपल्यालाच मिळावं यासाठी एकनाथ शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे. तर आमचे म्हणणे ऐकल्याशिवाय केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये अशी मागणी शिवसेनेकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली (Shiv Sena before Election Commission).
-
ECI asks Uddhav, Shinde factions to 'submit documentary evidence' to prove majority in Shiv Sena
— ANI Digital (@ani_digital) July 23, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/R78NrP98Oh#Maharashtra #UddhavThackarey #Shinde #Shivsena pic.twitter.com/NTIwmbuONk
">ECI asks Uddhav, Shinde factions to 'submit documentary evidence' to prove majority in Shiv Sena
— ANI Digital (@ani_digital) July 23, 2022
Read @ANI Story | https://t.co/R78NrP98Oh#Maharashtra #UddhavThackarey #Shinde #Shivsena pic.twitter.com/NTIwmbuONkECI asks Uddhav, Shinde factions to 'submit documentary evidence' to prove majority in Shiv Sena
— ANI Digital (@ani_digital) July 23, 2022
Read @ANI Story | https://t.co/R78NrP98Oh#Maharashtra #UddhavThackarey #Shinde #Shivsena pic.twitter.com/NTIwmbuONk
रस्सीखेच सुरू - सत्ता संघर्षपासून सुरू झालेली ही लढाई, आता पक्ष कोणाचा इथपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. धनुष्यबाण ही निशाणी आपल्याला मिळावी यासाठी आता एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. मात्र याबाबत येत्या 8 ऑगस्टला केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. दोन्ही बाजूने योग्य ती कागदपत्रे घेऊन आठ ऑगस्टला केंद्रीय निवडणूक आयोगापुढे दोन्ही पक्षाने उपस्थित राहण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे आठ ऑगस्टला धनुष्यबाण कोणाचा याबाबत निवडणूक आयोग निर्णय घेण्याची शक्यता आहे.
निशाणी शिवसेनेची ओळख - शिवसेनेला धनुष्यबाण ही निशाणी 19 ऑगस्ट 1989 साली केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आली होती. राज्यभरातच नाही तर, देशभरात शिवसेनेची निशाणी धनुष्यबाण पोहोचवली. धनुष्यबाण ही निशाणी शिवसेनेची ओळख आहे. त्यामुळे धनुष्यबान निशाणी ज्या गटाकडे जाईल तोच पक्ष अधिकृत शिवसेना म्हणून गणला जाईल. त्यामुळे एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात धनुष्यबाण चिन्हा साठी आता कायदेशीर लढाई सुरू झाली आहे.
विरोधकांना टोला - दोन दिवसापूर्वी झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही विरोधकांना टोला दिला होता. तुम्ही माझ्या भारतातले बाण घेऊन जाऊ शकता. मात्र धनुष्य माझ्याकडे आहे असे म्हटले होते. मात्र आता धनुष्य ही त्यांच्याकडून काढून घेण्याच्या हालचाली एकनाथ शिंदे गटाकडून सुरू झाले आहेत.