नवी मुंबई - नवी मुंबईत शिवसेनेला खिंडार पडले असून, तब्बल तीस नगरसेवक एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) गटाच्या वाटेवर असल्याची माहिती मिळते आहे. या नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा दिला आहे. नवी मुंबई महापालिका विरोधी पक्ष नेते विजय चौगुले हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंडखोरी केली तेव्हा पासून त्यांच्या संपर्कात होते. ठाण्यापाठोपाठ आता नवी मुंबईतील एक दोन नव्हे तर तब्बल तीस नगरसेवक हे शिंदे गटात सामील होणार आहे. व याविषयी नगरसेवक एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन आज रात्री भेट घेणार असल्याची देखील माहीती मिळाली आहे. नवी मुंबई मनपामध्ये शिवसेनेचे एकूण ३८ नगरसेवक होते. मात्र, त्यातील तीस नगरसेवक हे शिंदे गटाला मिळाल्याने नवी मुंबईत देखील शिवसेलेला खिंडार पडले आहे.
हेही वाचा - Cabinet Expansion : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार दोन टप्प्यात; 'या' तारखेची प्रतिक्षा
८ नगरसेवक शिवसेनेतच - नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका ( Navi Mumbai Municipal Corporation Election ) लवकरच होणार आहेत 30 नगरसेवक हे शिंदे गटाला सामील झाल्यामुळे शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे उर्वरित आठ नगरसेवक हे चौगुले यांच्याशी पटत नसल्याने शिंदे गटात सामील न झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, ऐन निवडणुकीच्या काळात हे आठ नगरसेवक देखील शिंदे गटात सामील होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.