ETV Bharat / city

Eknath Khadse on Devendra Fadnavis : 'पंकजा मुंडेंचा केवळ प्रचारासाठी वापर, फडणवीसांनीच निष्ठावंतांना डावलले' - एकनाथ खडसे भाजप विधान परिषद उमेदवार

महाराष्ट्रात भाजपला (Maharashtra BJP) निष्ठावंतांनी मोठे करण्याचे काम केले. मात्र, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी निष्ठावंतांना डावलून बाहेरच्या पक्षातील लोकांना पक्षात पुढे आणले, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse on Devendra Fadnavis) यांनी देवेंद्र फडणवीसांवर केला आहे.

devendra fadnavis eknath khadse
देवेंद्र फडणवीस - एकनाथ खडसे
author img

By

Published : Jun 9, 2022, 5:06 PM IST

मुंबई - महाराष्ट्रात भाजपला (Maharashtra BJP) निष्ठावंतांनी मोठे करण्याचे काम केले. मात्र, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी निष्ठावंतांना डावलून बाहेरच्या पक्षातील लोकांना पक्षात पुढे आणले, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse on Devendra Fadnavis) यांनी देवेंद्र फडणवीसांवर केला आहे. विधान परिषदेसाठी नामांकन अर्ज (Vidhan Parishad Election 2022) भरल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी (Pankaja Munde Vidhan Parishad Ticket) भाजपने नाकारली, अशी खंतही खडसेंनी व्यक्त केली.

हेही वाचा - Girish Mahajan Criticized Eknath Khadse : 'एकनाथ खडसेंचे मानसिक संतुलन बिघडले आहे'

केवळ प्रचारासाठी पंकजा मुंडेंचा वापर - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी मला संधी दिली. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचे अभिनंदन करतो. गेली ४० वर्षे भाजपामध्ये निष्ठेने काम केले. पूर्वी वाणी ब्राम्हणांचा पक्ष म्हणून भाजपची ओळख होती. गोपीनाथ मुंडे यांनी भाजपाचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न केला. अशा स्थितीमध्ये पंकजा मुंडे यांना उमेदवारी न देणे हे अत्यंत दुर्देवी आहे. खेदजनक आहे. पंकजा मुंडेंवर अन्याय झाला आहे. केवळ प्रचारासाठी पंकजा मुंडेंचा वापर केला जात आहे. विनोद तावडे, मुंडे, खडसे, फुंडकर या भाजपच्या मुख्य फळीतल्या निष्ठावंत नेत्यांना फडणवीस बाजूला करत आहेत. बाहेरच्या पक्षातील लोकांना पक्षामध्ये पुढे आणले जात आहे. नेतृत्व करतो तोच निर्णय घेत असतो. देवेंद्र फडणवीस आल्यामुळे भाजपमध्ये राजकारण सुरु झाले आहे. त्यांची फळे आमच्यासारखी निष्ठावंत लोक भोगत आहेत, अशी खंत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.

पूर्ण आयुष्य भाजपला दिले, पण... - मुंडे - महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजप वाढवली. आमचे पूर्ण आयुष्य भाजपला दिले. मात्र, नंतर आमच्यावर आरोप लावण्यात आले. आरोपांमुळे खोट्या नोटीस पाठवल्या. माझ्या खात्यात एक रुपया ठेवला नाही. सातत्याने डावलण्यात आले. त्यामुळे अनेक वेळा अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली. भाजपात असताना विधान परिषदेसाठी नाव देण्याचे आश्वासन दिले होते. अनेक प्रसंग असे घडत गेले की त्यामुळे मला नाईलाजाने भाजपाचा त्याग करुन राष्ट्रवादीमध्ये यावे लागले. मला आज न्याय मिळाला असून शरद पवार यांच्या नेतृत्वावर मी विश्वास ठेवला आणि त्यांनी आज माझ्यावर विश्वास टाकला. तो विश्वास मी सार्थ करेन. आमच्या भागामध्ये भाजप वाढण्यासाठी उभे आयुष्य काढले आता राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यासाठी काम करेन, असे एकनाथ खडसे म्हणाले.

हेही वाचा - Ekanath Khadase on Ashish Shelar : आशिष शेलार यांच्या गौप्यस्फोटावर एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.