मुंबई - राज्यात कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षा संदर्भात जो निर्णय घेतला आहे, तो निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताच्या विरोधात जाईल आणि विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्यासारखे होईल, असे सांगत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांना पत्र लिहिले आहे. सामंत यांनी पत्रात राज्यातील एकूणच परिस्थितीचा अंदाज आणि त्यातून उद्भवणारी परिस्थिती नमूद करत, या परीक्षा घेणे किती धोक्याचे होऊ शकते, या संदर्भातील माहिती दिली आहे. तसेच ही परीक्षा घेणे बंधनकारक करण्यात येऊ नये, अशी विनंती त्यांनी केली आहे.
हेही वाचा - नगरविकास विभागाकडून तब्बल 76 मुख्याधिकाऱ्यांच्या बदल्या; मुख्यमंत्र्यांच्या भुमिकेकडे लक्ष
उदय सामंत यांचे ट्विट :
'युजीसीने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्या संदर्भात दिलेली मार्गदर्शक तत्वे म्हणजे सर्वांनाच धक्का आहे. महाराष्ट्रातील कोविडची परिस्थिती माहिती असतानाही, घेतलेला हा निर्णय म्हणजे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळल्यासारखे आहे' अशी माहिती उदय सामंत यांनी आपल्या ट्विट द्वारे दिली आहे.
-
मी केंद्र सरकारला लिहिलेलं पत्र.. pic.twitter.com/UjAkgsQBcG
— Uday Samant (@samant_uday) July 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">मी केंद्र सरकारला लिहिलेलं पत्र.. pic.twitter.com/UjAkgsQBcG
— Uday Samant (@samant_uday) July 7, 2020मी केंद्र सरकारला लिहिलेलं पत्र.. pic.twitter.com/UjAkgsQBcG
— Uday Samant (@samant_uday) July 7, 2020
महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, सध्या राज्यामध्ये दोन लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये परीक्षा घेणे हे राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांच्या दृष्टीने व्यवहार्य नाही. बहुतांश कॉलेज, शैक्षणिक संस्था, हॉस्टेल हे क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरण्यात येत आहेत. तसेच अनेक विद्यार्थी हे आपल्या गावी गेले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना गावाहून येणे व त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणे शक्य नसल्याने परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांना संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यापूर्वीच्या पत्रामध्ये मी परीक्षा रद्द करण्याबाबत आपल्याला विनंती केली होती. त्याचा केंद्र सरकारने पुन्हा एकदा विचार करावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.
हेही वाचा - अभिनेत्री प्रिया बेर्डेंचा खासदार सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
देशातील पंजाब, हरयाणा, राजस्थान, ओडिशा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांनी कोरोना आणि त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन तसेच आयआयटीने अंतिम परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या अन्य सत्रांच्या गुणांचे मूल्यांकन करून निकाल जाहीर करण्याचे ठरवले होते. तसेच एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षा द्यायची असल्यास तशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे यूजीसीने काल जाहीर केलेली मार्गदर्शक तत्त्वे बंधनकारक करण्यात येऊ नये, अशी विनंती ही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आपल्या पत्रात केली आहे.