ETV Bharat / city

हक्कभंग प्रकरणात संपादक अर्णब गोस्वामी यांना समन्स

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बद्दल अर्वाच्च भाषा वापरल्याने संपादक अर्णब गोस्वामी यांना हक्कभंगाची नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र ते याआधी गैरहजर राहिले होते.

Editor Arnab Goswami summoned in violation case
हक्कभंग प्रकरणात संपादक अर्णब गोस्वामी यांना समन्स
author img

By

Published : Mar 2, 2021, 8:13 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबद्दल अर्वाच्च भाषा वापरल्याने संपादक अर्णब गोस्वामी यांना हक्कभंगाची नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र ते याआधी गैरहजर राहिले होते. त्यामुळे आता या संदर्भात अर्णब गोस्वामी यांना हक्कभंग समितीसमोर उपस्थित राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. उद्या सायंकाळी पाच वाजता विधानभवनात हजर राहून त्यांना आपली साक्ष नोंदवावी लागणार आहे. तर आमदार प्रताप सरनाईक यांची देखील साक्ष या प्रकरणात नोंदवली जाईल.

उद्या अर्णब गोस्वामी हक्कभंगाच्या कारवाईसाठी उपस्थित राहणार का, याकडे देखील सगळ्यांचे लक्ष असणार आहे. निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना आपलं काम व्यवस्थित करण्यात यावे म्हणून काही विशेष अधिकार दिले जातात. काम करत असताना आमदार किंवा खासदार यांचा कोणी अपमान केला तर त्यांच्याविरोधात हक्कभंग केला जाऊ शकतो.

काय आहे हे प्रकरण?

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात वार्तांकन करताना संपादक अर्णब गोस्वामी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी शब्दात उल्लेख केला होता. तसेच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची देखील अर्वाच्च भाषेत सूत्रसंचालन करत आव्हान देणारी भाषावापरली होती. त्यामुळे राज्य सरकारवर तसेच राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्री आणि मंत्र्यांवर अर्वाच्च भाषा वापरल्या कारणाने आमदार प्रताप सरनाईक यांनी संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात हक्कभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली होती.

हेही वाचा- पूजा चव्हाण प्रकरणात कारवाई का नाही? विधानसभेत देवेंद्र फडणवीस आक्रमक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.