ETV Bharat / city

Sanjay Raut ED Probe : संजय राऊत कोठडी असताना सामनामधील रोखठोक कुणी लिहिले? ईडी करणार चौकशी

संजय राऊत यांच्या लेखाची ईडी चौकशी करणार ( ED probe of Sanjay Raut ) आहे. मागील सात दिवसांपासून संजय राऊत हे ईडीच्या कोठडीत आहे. त्यामुळे कोठडीत असताना रविवारच्या सामनाच्या अंकात रोखठोक सदर कुणी लिहिला याची चर्चा रंगली आहे. आता ईडीन सुद्धा या रोखठोक सदराची दखल घेतली आहे.

Sanjay Raut
संजय राऊत
author img

By

Published : Aug 8, 2022, 10:13 AM IST

मुंबई-शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांच्या अडचणी कमी होताना ( ED probe of Sanjay Raut articles ) दिसत नाही आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरणात ईडीने अटक केली होती. संजय राऊत यांचे दर रविवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून रोखठोक नावाने ( Sanjay Rauts article published in Saamana ) सदर येत असते. या सदरामध्ये संजय राऊत यांनी अटकेत असताना देखील रविवारी त्यांच्या नावाने प्रसिद्ध झालेल्या रोखठोकमधून राज्यपाल यांच्या विरोधात रोखठोक लेख प्रसिद्ध झाले. आता ईडीकडून तपास करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या ( Sanjay Raut writing in custody ) आणखी अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

संजय राऊत यांच्या लेखाची ईडी चौकशी करणार ( ED probe of Sanjay Raut ) आहे. मागील सात दिवसांपासून संजय राऊत हे ईडीच्या कोठडीत आहे. त्यामुळे कोठडीत असताना रविवारच्या सामनाच्या अंकात रोखठोक सदर कुणी लिहिला याची चर्चा रंगली आहे. आता ईडीन सुद्धा या रोखठोक सदराची दखल घेतली आहे. संजय राऊत कोठडीत असताना त्यांनी काही लिहिण्याबद्दल कोर्टाकडून विशेष परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे कोठडीमध्ये राऊत यांनी लेख लिहून कुणाच्या हाताने पाठवला का याचा तपास आता ईडी करणार आहे.

सामनामध्ये आलेल्या रोखठोक मधील संजय राऊत यांचे लेखा विरोधात मनसेकडून देखील टीका करण्यात आले होते. मनसेकडून संदीप देशपांडे यांनी असे म्हटले होते की संजय राऊत हे काही स्वातंत्र्यसैनिक आहेत का? ते कस्टडीमध्ये असताना अशा प्रकारे लिखाण करत आहेत. अशाप्रकारे मनसे करून टीका देखील करण्यात आले होते.

काय होता संजय राऊतांचा लेख? कोश्यारी यांनी त्यांच्या एका भाषणात काय सांगितले? गुजराती व मारवाडी लोक मुंबईत आहेत. त्यामुळे मुंबईस आर्थिक राजधानीचा दर्जा आहे. गुजराती मारवाडी लोकांना बाहेर काढले तर मुंबईत पैसाच शिल्लक राहणार नाही. राज्यपालांचे हे विधान निर्हेतुक कसे असेल? मुंबईतील गुजराती-मारवाडी समाजाच्या लोकांनाही कोश्यारी यांचे विधान आवडले नाही. त्यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला. अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींचा उल्लेख राष्ट्रपत्नी असा करताच. ज्यांचे पित्त खवळले त्यांनी महाराष्ट्राच्या व शिवरायांच्या अपमानाबद्दल साधा निषेध केला नाही. हासुद्धा महाराष्ट्राचा अपमानच आहे अशी टीका राऊत यांनी केली होती.

गुजराती व मारवाडी लोकांनी मुंबईत येऊन व्यापार केला-महाराष्ट्राच्या भूगोलावर मुंबई आहे व मुंबईवर मराठी माणसांचा पहिला हक्क आहे. पैशात तो कमी असेल आणि आता तर मराठी माणसाने पैसा कमवायचे म्हटले की तो अपराध ठरतो. मराठी माणसांचे साखर कारखाने सूत गिरण्या व इतर उद्योगांना ईडीने टाळे लावले व मराठी उद्योजकांच्या मागे ससेमिरा लावला. राज्यपाल महोदय कधीतरी यावरही बोला. राज्यपाल कोश्यारी यांनी आता महाराष्ट्राची माफी मागितली आहे. त्यामुळे विषयावर पडदा पडला असला तरी मुंबईच्या विरोधातील कारस्थाने सुरूच राहतील. ती कायमचीच थांबवायला हवीत असंही राऊत म्हणाले.

संजय राऊत यांच्या कोठडीवर आज सुनावणी- शिवसेना खासदार संजय राऊत यांना आज जामीन मिळणार की कोठडी ? याचा आज फैसला होणार आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या अटकेत असलेल्या संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. ईडी आज पुन्हा एकदा संजय राऊत यांची कोठडी वाढवून मिळावी, यासाठी मागणी करणार आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना 1ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता, त्यांना 4 ऑगस्टपर्यंत कस्टडी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांची कस्टडी पुन्हा 8 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आले होते. आज पुन्हा राऊत यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून त्यांची पुन्हा कस्टडी देण्याची शक्यता आहे

हेही वाचा-Ratan Tata : उद्योगपती रतन टाटा यांनी केला एक कॉल; उद्योजकाचं असं बदललं नशीब

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.