मुंबई - पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत ( Sanjay Raut political journey ) यांच्या घरी छापा टाकला आहे. संजय राऊत यांची चौकशी होत आहे. राऊत यांना ( Ed rain sanjay raut house ) समन्स देण्यात आले होते. मात्र, आज सकाळपासून संजय राऊत ( ED action on sanjay Raut ) यांची चौकशी सुरू आहे आहे. संजय राऊत हे नेमहमीच राजकीय टीका टिप्पणीमुळे चर्चेत राहतात. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासह जाणाऱ्या शिवसेना आमदारांवर त्यांनी टीकेची झोड उठवली होती. समानातून देखील ते विरोधकांवर राजकीय प्रहार करतच असतात. संजय राऊत यांच्या बोलण्याच्या पद्धतीवर काही आमदारांनी आक्षेप देखील घेतलेला आहे. वादाच्या भोवऱ्यात असणारे संजय राऊत कोणे आहे? त्यांच्या राजकीय प्रवास कसा आहे? याबाबत जाणून घेऊया.
हेही वाचा - Reactions On ED raid : संजय राऊतांच्या कारवाईवर नेत्यांच्या प्रतिक्रीया; पाहा कोण काय म्हणाले
बाळासाहेबांनी का केले जवळ? - संजय राऊत हे लोकप्रभामध्ये पत्रकार होते. लोकप्रभामध्ये संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेक मुलाखती छापल्या. या मुलाखती गाजल्यानंतर बाळासाहेबांनी संजय राऊत यांना आपल्या सामना या दैनिकात बोलावले. सामनाचे कार्यकारी संपादक पदाची जबाबदारी राऊत यांच्यावर सोपवली. राऊत यांच्या लिखाणाची आक्रमक शैली आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पोचवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न हे बाळासाहेबांना भावले. शिवसेनेवरील राऊत यांनी दाखवलेली निष्ठा पाहून बाळासाहेबांनी त्यांना राज्यसभेची खासदारकी सुद्धा दिली. संजय राऊत हे त्याच वेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सोबतही सुर जुळवून घेऊ लागले. मात्र राजकारणात अधिक सक्रिय असलेल्या राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्या अधिक मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले. अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि संजय राऊत यांचे सहकारी अनिकेत जोशी यांनी व्यक्त केली.
राज ठाकरे यांचा राजीनामा राऊतांनी लिहिल्याची चर्चा - शिवसेनेमध्ये संजय राऊत हळूहळू ठाकरे घराण्याचे सल्लागार म्हणून ओळखले जाऊ लागले होते. दरम्यान, राज ठाकरे यांनी नाराज होऊन शिवसेनेपासून फारकत घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना लिहिलेले पत्र आणि दिलेला राजीनामा हा संजय राऊत यांनी लिहून दिला असल्याचे चर्चा जोरदार रंगली. त्यामुळे राऊत यांच्या निष्ठे विषयी शिवसेनेत दबक्या आवाजात चर्चा होत असली तरी बाळासाहेबांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केले.
संजय राऊत हे जुळवून घेण्यात पटाईत - संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर सोयीस्कररीत्या राज ठाकरे आणि त्यानंतर आपले हित कशात आहे, हे पाहून उद्धव ठाकरे यांच्याशी जुळवून घेतले. बदललेल्या राजकीय परिस्थितीत शरद पवार यांच्या सोबत सुरुवातीपासूनच मधून संबंध असलेल्या संजय राऊत यांना महत्त्व आले. म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या माध्यमातून महाविकासआघाडीचा पूल बांधला, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे माजी खासदार भारतकुमार राऊत यांनी व्यक्त केली.
राऊत यांची निष्ठा बेभरवशाची - संजय राऊत हे शिवसेनेसोबत आहेत, बाळासाहेब ठाकरे नंतर त्यांनी आपण शिवसेनेसोबत कायम आहोत आणि ठाकरे कुटुंबीयांशी आपली निष्ठा कायम असल्याचे म्हटले असले तरी संजय राऊत यांची निष्ठा ही बेभरवशाची आहे. ते सध्या जरी उद्धव ठाकरे आणि त्यानंतर भविष्याचा वेध घेऊन आदित्य ठाकरे यांच्यासोबत असल्याचे दाखवत असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती बदलल्यास त्यांची निष्ठा बदलू शकते. शरद पवार यांच्याकडे त्यांचा नेहमीच जास्त ओढा राहील, अशी प्रतिक्रिया भारतकुमार राऊत यांनी व्यक्त केली.
आदित्य ठाकरे यांच्यासोबत का? - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे अतिशय धुरंधर राजकारणी होते. त्यामुळे त्यांच्या सोबत राहणे, हे राजकीय दृष्ट्या हिताचे असल्याचे राऊत यांना ठाऊक होते. उद्धव ठाकरे हे मवाळ स्वभावाचे राजकारणी असले तरी कुशल संघटक आणि मुत्सद्दी नेते आहेत. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे सक्रिय राजकारणात ते किती काळ राहतील याबाबत शंका असल्याने शिवसेनेची सर्व मदार आणि पुढील राजकीय धुरा ही सर्वस्वी आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर आहे. हेच संजय राऊत यांनी जोखले असल्यामुळे त्यांनी आता आदित्य यांच्या हनुमानाची भूमिका निभावण्याचा सुरुवात केली असल्याचेही भारतकुमार राऊत यांनी सांगितले.
हेही वाचा - फ्रंटलाईनवर खेळू शकत नसल्याने भाजपकडून तपास यंत्रणांचा वापर - शिवसेना प्रवक्ते आनंद दुबे