ETV Bharat / city

ED raid two places in Mumbai: मुंबईतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीकडून दोन ठिकाणी छापेमारी - 4 ऑगस्टपर्यंत ईडी कस्टडी

पत्राचाळ घोटाळ्यासंदर्भात मुंबईत ईडीकडून दोन ठिकाणी छापेमारी सुरू आहे ( ED raid at two places in Mumbai ). संजय राऊत यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. पत्राचाळ प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर सोमवारी न्यायालयाने 4 ऑगस्टपर्यंत ईडी कस्टडी ( court granted ED custody till August 4 ) देण्यात आली आहे.

ED raids two places
ईडीकडून दोन ठिकाणी छापेमारी
author img

By

Published : Aug 2, 2022, 2:52 PM IST

Updated : Aug 2, 2022, 5:25 PM IST

मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत ( Shiv Sena leader Sanjay Raut ) यांच्या गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळ्यासंदर्भात मुंबईत ईडीकडून दोन ठिकाणी छापेमारी सुरू आहे ( ED raid at two places in Mumbai ). संजय राऊत यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. पत्राचाळ प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर सोमवारी न्यायालयाने 4 ऑगस्टपर्यंत ईडी कस्टडी ( court granted ED custody till August 4 ) देण्यात आली आहे.

दोन ठिकाणी धाडी - संजय राऊत यांची ईडी अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या चौकशी दरम्यान राऊत यांनी काही महत्त्वाचे माहिती दिल्यानंतर ईडीने आजी कारवाई सुरू केली आहे. पत्राचाळ प्रकरणी ईडीने दोन ठिकाणी धाडी टाकल्या आहे. दादर आणि कांजूरमार्ग या दोन ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. या धाडी राऊत यांच्या घरी टाकल्या आहेत का ही माहिती अजून मिळू शकली नाही. मात्र पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ( Patra Chawl Scam ) संजय राऊत यांची चौकशी केली होती. या चौकशीतून काही माहिती समोर आली होती. त्यानुसार दोन ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. पत्राचाळ प्रकरणात काही बैठक झाल्या होत्या काही कागदपत्र हाती घ्यायची आहे. या प्रकरणात ईडी आणखी काही लोकांना समन्स बजावून चौकशीला देखील बोलवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात संजय राऊत यांच्या आणखी अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

पत्रा चाळ प्रकरण नेमके काय? - पत्रा चाळ किंवा सिद्धार्थ नगर हे मुंबईतल्या गोरेगाव भागात आहे. पत्रा चाळीतल्या 672 भाडेकरूंना नवीन घर बांधून द्यायचं आणि उरलेली जागा खासगी विकासकांना विकायची असा करार गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड ने म्हाडासोबत 2007 साली केला. जीएपीसीएल म्हाडा आणि भाडेकरू या तिघांमध्ये हा करार झाला होता. पण 14 वर्षांनंतरही हा करार कागदावरच राहिला. पत्रा चाळचे रहिवासी अजूनही घर मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

ईडीची केस काय? - ईडीने केलेल्या दाव्यानुसार जीएपीसीएलच्या बेकायदेशीर कारवाईमधून 1,039.79 कोटी रुपयांचा घोटाळा झाला. प्रविण राऊत यांना एचडीआयएलकडून 100 कोटी रुपये मिळाले. हे पैसे नंतर वेगवेगळ्या अकाऊंटमध्ये वळवण्यात आले. ही खाती प्रविण राऊत यांच्या जवळचे कुटुंबातले सदस्य आणि व्यावसायिकांची आहेत. ज्यात संजय राऊत यांच्या कुटुंबाचाही समावेश आहे, असे इडीने सांगितले आहे. 2010 साली संजय राऊत यांची पत्नी वर्षा यांच्या खात्यात प्रविण राऊत यांची पत्नी माधुरी यांनी 83 लाख रुपये जमा केले.

वर्षा राऊतांनी दादरमध्ये घर घेतले - 83 लाखांचा वापर दादरमध्ये घर विकत घेण्यासाठी केला असा दावा इडीने केला आहे. इडीची चौकशी सुरू झाल्यानंतर वर्षा राऊत यांनी माधुरी यांना 55 लाख रुपये ट्रान्सफर केले. याच काळात अलिबागमध्ये किहीम बिचजवळ वर्षा राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्या नावाने 8 प्लॉट विकत घेण्यात आले. यातल्या स्वप्ना पाटकर या सुजित पाटकर यांच्या पत्नी आहेत.

प्रविण राऊत आणि संबंधितांची संपत्ती जप्त - सुजित पाटकर हे संजय राऊतांच्या जवळचे आहेत. जमिनीच्या या व्यवहारामध्ये नोंदणीकृत किंमतीशिवाय जमिन विकणाऱ्याला रोख रक्कमही देण्यात आली. ही संपत्ती आणि प्रविण राऊत यांच्या इतर संपत्तीची माहिती घेतल्यानंतर प्रविण राऊत आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींची संपत्ती जप्त करण्यात आली अशी माहिती इडीने दिली. दोन समन्सनंतर संजय राऊत चौकशीसाठी हजर राहिले नाहीत त्यानंतर इडीने रविवारी सकाळीच संजय राऊत यांच्या घरावर धाड टाकली.

संजय राऊतांची आणखी चौकशी - दिवसभर चौकशी केल्यानंतर संजय राऊत यांना ताब्यात घेण्यात आलं आणि नंतर त्यांना अटक करण्यात आली. इडीने याआधी राऊतांची दादर आणि अलिबागमधली संपत्ती जप्त केली आहे. प्रविण राऊत यांच्यासोबत संजय राऊत यांचे व्यावसायिक आणि इतर कोणते संबंध आहेत? तसंच संजय राऊत यांच्या पत्नीच्या प्रॉपर्टी डिलबाबत इडीला संजय राऊत यांची चौकशी करायची आहे.

हेही वाचा - Har Ghar Tiranga : राष्ट्रध्वजाची निर्मिती करणारे पिंगाली वेंकय्या यांचा आज जन्मदिन, जाणून घ्या, त्यांचे योगदान

Last Updated : Aug 2, 2022, 5:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.