ETV Bharat / city

Income Tax Raids : जाधव यांच्या घरी दुसऱ्या दिवशीही छापेमारी सुरूच, तपास यंत्रणा दुधारी तलवार, त्या दोन्ही बाजूने वापरता येतात -पेडणेकर - किशोरी पेडणेकर बातमी

अशा कारवायांनी कुणाला आसूरी आनंद होत असेल तर तो त्यांना लखलाब. मात्र, हे लक्षात ठेवा की, या तपास यंत्रणा दुधारी तलवार असतात त्या दोन्ही बाजूने वापरता येतात. (Shiv Sena leader Yashwant Jadhav) शिसेनेला नाही तर सर्व सकरलाच सध्या डॅमेज करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, अशा कोणत्याही कारवायांनी ना शिवसेना डॅमेज होईल ना हे सरकार डॅमेज होईल अशी प्रतिक्रिया मुंबई मनपाच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

मुंबई मनपाच्या महापौर किशोरी पेडणेकर
मुंबई मनपाच्या महापौर किशोरी पेडणेकर
author img

By

Published : Feb 25, 2022, 8:41 AM IST

Updated : Feb 26, 2022, 8:25 AM IST

मुंबई - ही आयटीची धाड पहिल्यांदाच कुणावर पडली आहे अस नाही. दरम्यान, आयटीला जी काही माहिती लागेल ती माहिती आमचे यशवंत जाधव त्यांना देतील. दरम्यान, ज्या राज्यात भाजपचे सरकार नाही त्या राज्यात या तपास यंत्रणा विरोधकांना त्रास देत आहेत. (Income Tax Raids Yashwant Jadhav Home) 'भाजपमधले सर्व दुध के धुले' आहेत अस म्हणत आम्ही घाबरत नाहीत. जी काही धाड टाकायची ती टाका. त्याला आमचे यशवंत जाधव उत्तर देतील अशी प्रतिक्रिया मुंबई मनपाच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. त्या यशवंत जाधव यांच्या निवास्थानी आल्या तेव्हा पत्रकारांशी बोलत होत्या. दरम्यान आजही (दि. २६ फेब्रुवारी) जाधव यांच्या घरामध्ये अधिकारी उपस्थित आहेत. त्यांच्यावर छाप्याची कारवाई सकाळपासून अजूनही सुरू आहे.

मुंबई मनपाच्या महापौर किशोरी पेडणेकर

या तपास यंत्रणा दुधारी तलवार आहेत. त्या दोन्ही बाजूने वापरता येतात

2020 ला किरीट सोमैया यांनी माझे नाव घेतले होते. मात्र, कोणतेही पुरावे नाहीत ना कोणताही आरोप सिध्द झाला, असही पेडणेकर म्हणाल्या आहेत. या तपास यंत्रणा दुधारी तलवार आहेत. त्या दोन्ही बाजूने वापरता येतात हे लक्षात ठेवा असा इशाराही त्यांनी यावेळी दिली आहे. (Mayor Kishori Pednekar on ED, Income Tax) सत्ता गेल्यानंतर यांच्या बुडाला आग लागली आहे. आणि हेही लक्षात ठेवा छगण भुजबळ हे पहिले खरे शिवसैनिक आहेत. त्यांच्यावरही असे आरोप करत त्यांना जेलमध्ये टाकले. पण लक्षात घ्या ते आज कॅबीनेट आहेत. त्यामुळे हे असल्या कारवाया आम्ही सहन करू पण घाबरणार नाहीत असे खडे बोलही त्यांनी यावेळी सुनावले आहेत.

अशा कारवायांनी भाजपवाल्यांना आसूरी आनंद

शिसेनेला नाही तर सर्व सकरलाच डॅमेज करण्याचा यांचा प्रयत्न आहे. मात्र, हे लोकांना समजते. आणि अशा कोणत्याही कारवायांनी ना शिवसेना डॅमेज होईल ना हे सरकार डॅमेज होईल. अस काहीच होणार नाही. दरम्यान, अशा कारवायांनी भाजपवाल्यांना आसूरी आनंद होणार असेल तर हा आनंद त्यांना लखलाब असही त्या म्हणाल्या आहेत. तसेच, मी जाधव यांच्या चौकशीत कोणताही हस्तक्षेप करणार नाही असही त्या म्हणाल्या आहेत.

इन्कम टॅक्स अधिकारी सीआरपीएफ जवानांसह सकाळीच यशवंत जाधव यांच्या घरी

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर आता केंद्रीय तपास यंत्रणांनी आपला मोर्चा शिवसेनेकडे वळवला आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या माझगाव येथील घरावर धाड टाकली आहे. इन्कम टॅक्स अधिकारी सीआरपीएफ जवानांसह सकाळीच यशवंत जाधव यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी घरातच यशवंत जाधव यांची चौकशी सुरु केल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेनेसाठी मोठा धक्का

जाधव यांच्या घरात कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. परंतु, यशवंत जाधव यांची नेमकी कोणत्या प्रकरणात चौकशी सुरू आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. यशवंत जाधव हे गेल्या पाच वर्षांपासून पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून सातत्याने केला जातो. त्यामुळे आता संजय राऊत यांच्यानंतर शिवसेनेचा आणखी एका नेता केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आला आहे. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जातो. विशेष म्हणजे नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ मंत्रालयाशेजारी महाविकासआघाडीचे जे धरणे आंदोलन झाले होते त्यामध्ये यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव सहभागी झाल्या होत्या. त्याच्याच दुसऱ्या दिवशी यशवंत जाधव यांच्या घरी धाड पडल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.

ईडीची धाड नाही

सुरुवातीला ईडीने ही धाड टाकल्याचे सांगितले जात होते. मात्र, ईडीच्या अधिकाऱ्यांनी आपण यशवंत जाधव यांच्या घरी धाड टाकली नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ही आयकर विभागाची धाड असल्याचे स्पष्ट झाले आहे. आयकर विभागाने काही दिवसांपूर्वी यशवंत जाधव यांना नोटीस पाठवली होती. त्यामुळेच आयकर विभागाने ही धाड टाकली असल्याची माहिती पुढे आली.

हेही वाचा - गृह मंत्रालयाकडून एसआयटीची स्थापना; लोकप्रतिनिधींच्या धमक्यांची करणार चौकशी

Last Updated : Feb 26, 2022, 8:25 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.