ETV Bharat / city

ED opposes Nawab Malik bail : नवाब मलिक यांच्या वैद्यकीय जामीन अर्जाला ईडीचा विरोध - नवाब मलिक जामीन विरोध ईडी

कॅबिनेट मंत्री नवाब मलिक ( ED opposes Nawab Malik bail ) यांच्या वैद्यकीय जामीन अर्जाला ईडीचा विरोध असल्याची सूत्रांची माहिती आहे. नवाब मलिक यांनी मागील महिन्यात किडनीवर शस्त्रक्रिया करण्याकरिता जामीन अर्ज दाखल केला होता. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाने ईडीला ( Nawab Malik bail news ) जामीन अर्जावर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते.

ED opposes Nawab Malik bail
नवाब मलिक
author img

By

Published : May 2, 2022, 11:57 AM IST

मुंबई - कॅबिनेट मंत्री नवाब मलिक ( ED opposes Nawab Malik bail ) यांच्या वैद्यकीय जामीन अर्जाला ईडीचा विरोध असल्याची सूत्रांची माहिती आहे. नवाब मलिक यांनी मागील महिन्यात किडनीवर शस्त्रक्रिया करण्याकरिता जामीन अर्ज दाखल केला होता. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाने ईडीला ( Nawab Malik bail news ) जामीन अर्जावर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. ईडीकडून जामीन अर्जावर लेखी उत्तर आज दुपारी न्यायालयात सादर करण्यात येईल.

हेही वाचा - Police notice to MNS party workers : महाआरती अगोदरच मनसे कार्यकर्त्यांना 149 ची नोटीस

ईडी राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या वैद्यकीय जामीन अर्जाला विरोध करेल. आज दुपारपर्यंत अर्जाचे उत्तर दाखल केले जाईल, असे ईडीचे वकील सुनील गोन्झाल्विस यांनी विशेष पीएमएलए कोर्टात सांगितले.

सत्र न्यायालयात अर्ज - नवाब मलिक ( Nawab Malik ) यांच्याकडून वैद्यकीय शस्त्रक्रियेसाठी सत्र न्यायालयात जामीन अर्ज करण्यात ( Nawab Malik Bail Application ) आला आहे. मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर मुंबईतील विशेष न्यायालयात सुनावणी होणार आहे. नवाब मलिकांच्या जामीन याचिकेवर ईडी आज उत्तर दाखल करणार आहे. न्यायालयाने ईडीला सोमवारी उत्तर देण्यास सांगितले होते. किडनीच्या त्रासामुळे मलिक यांच्या वकिलाने शस्त्रक्रियेची परवानगी मागितली आहे. मलिक यांनी वैद्यकीय आधारावर जामीन अर्ज दाखल ( Malik bail application for medical surgery ) केला आहे.

23 फेब्रुवारी रोजी झाली होती अटक - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी वैद्यकीय प्रक्रियेसाठी जामीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर ईडीला सोमवार पर्यंत उत्तर देण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयातील विशेष PMLA कोर्टाने दिले आहे. कुर्ला येथील जमीन व्यवहारात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर सोबत झालेल्या आर्थिक व्यवहार प्रकरणात नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून नवाब मलिक आर्थर रोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत.

वैद्यकीय शस्त्रक्रियेसाठी सत्र न्यायालयात जामिनाचा अर्ज - नवाब मलिक यांनी मुंबई सत्र न्यायालयात किडनीच्या शस्त्रक्रियेकरीता जामीन अर्ज दाखल केला आहे. मागील सुनावणीवेळी मुंबई सत्र न्यायालयाने ईडीला जामीन अर्जावर सोमवार पर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. नवाब मलिक यांनी यापूर्वी ईडीकडून करण्यात आलेली कारवाई ही बेकायदेशीर असल्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावेळी न्यायालयाने नवाब मलिक यांना कुठलाही अंतरिम दिलासा दिला नव्हता. तर, नियमित सुनावणी केल्यानंतर याचिकेवर निर्णय देण्यात येईल, असे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने म्हटले होते. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात नवाब मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्या ठिकाणी देखील नवाब मलिक यांना कुठलाही दिलासा न देता सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर नवाब मलिक यांनी आता वैद्यकीय शस्त्रक्रियेसाठी सत्र न्यायालयात जामिनाचा अर्ज दाखल केला.

हेही वाचा - Gold Silver Price Today : अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंधेला सोनं-चांदी स्वस्त; वाचा आजचे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.