ETV Bharat / city

Chhagan Bhujbal On Navneet Rana : मलिकांवर ईडीची कारवाई, मग नवनीत राणांवर का नाही?; भुजबळांचा सवाल - संजय राऊत नवनीत राणा

नवनीत राणा ( Mp Navneet Rana ) यांनी दाऊदचा हस्तक असलेला युसूफ लकडावालाकडून ( Yusuf Lakdawala Money Laundering Case ) पैसै घेतल्याचे समोर आले. मग ईडी राणांवर का कारवाई करत नाही, असा सवाल भुजबळांनी विचारला ( Chhagan Bhujbal ) आहे.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal
author img

By

Published : Apr 27, 2022, 7:21 PM IST

मुंबई - बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या व्यक्तीकडून पाच लाख रुपये किंमतीची जमीन खरेदी केली, असा आरोप करून ईडीने मंत्री नवाब मलिक ( ED Arrest Nawab Malik ) यांना अटक केली. मग खासदार नवनीत राणांनी ( Mp Navneet Rana ) दाऊदचा हस्तक असलेला युसूफ लकडावालाकडून ( Yusuf Lakdawala Money Laundering Case ) ऐंशी लाख रुपये घेतल्याचे एफिडेविट खासदार संजय राऊतांनी (Mp Sanjay Raut ) समोर आणले आहे. मग ईडी नवनीत राणांवर कारवाई का करत नाही?, असा सवाल राज्याचे अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी उपस्थित केला आहे. ते पक्ष कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

छगन भुजबळ प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

राणा मागासवर्गीय नाही - आपण मागासवर्गीय असल्यामुळे अटकेत असताना आपल्याला पाणी दिले नाही. शौचालयाचा वापर करू दिला नाही, असा आरोप नवनीत राणांनी पोलिसांवर केला आहे. मात्र, नवनीत राणा या मागासवर्गीय नाही, असे खुद्द मुंबई उच्च न्यायालयाने ( Mumbai High Court On Naneet Rana ) सांगितले आहे. आता या विरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले असले तरी, ते मागासवर्गीय आहेत का? याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह आहेत. तसेच, पोलीस स्टेशनमध्ये अन्याय झाला असे राणा म्हणत असतील तर, पोलिसांविरोधात त्यांनी तक्रारही केली नसल्याचे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - Sanjay Raut : राजभवन गुन्हेगारांना संरक्षण कसे देते?, संजय राऊतांचा सवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.