ETV Bharat / city

महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची ईडीकडून 7 तास चौकशी - ED probe in Maharashtra

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ( Minister Prajakt Tanpure ) यांनी 2012 मध्ये महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेचे मधून लिलावाच्या माध्यमातून साखर कारखाना खरेदी केला होता. हा साखर कारखाना 13 कोटीमध्ये खरेदी करण्यात आला होता. मात्र, या साखर कारखान्याची मूळ किंमत 26 कोटी होती. राज्यमंत्री तनपुरे यांनी 13 कोटींमध्ये हा कारखाना खरेदी केला होता. त्यामुळे या प्रकरणात काही संशयास्पद व्यवहार ( ED investigates Minister of State Prajakt Tanpure ) झाला असल्याचा ईडीला संशय आहे. तनपुरे यांची ईडीने 7 तास चौकशी केली.

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
author img

By

Published : Dec 7, 2021, 10:13 PM IST

Updated : Dec 8, 2021, 9:34 AM IST

मुंबई- महाराष्ट्र विकास आघाडीचे अनेक मंत्र्यांवर ईडी चौकशीचा ( ED probe in Maharashtra ) ससेमिरा सुरू आहे. त्यात आता राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची ईडीकडून महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी ( Maharashtra Cooperative Bank scam ) मंगळवार (7 डिसेंबर) रोजी 7 तास चौकशी झाली. प्राजक्त तनपुरे यांनी लिलावात घेतलेला अहमदनगर येथील साखर कारखान्यात गैरव्यवहार झाला असल्याच्या संशयावरून ईडीकडून चौकशी सुरू आहे.

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी 2012 मध्ये महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेमधून लिलावाच्या माध्यमातून साखर कारखाना खरेदी केला होता. हा साखर कारखाना 13 कोटीमध्ये खरेदी करण्यात आला होता. मात्र, या साखर कारखान्याची मूळ किंमत 26 कोटी होती. राज्यमंत्री तनपुरे यांनी 13 कोटींमध्ये हा कारखाना खरेदी केला होता. त्यामुळे या प्रकरणात काही संशयास्पद व्यवहार झाला असल्याचा ईडीला संशय आहे. त्याबाबत चौकशीसाठी प्राजक्त तनपुरे यांना ईडीला कार्यालयात बोलाविण्यात आले होते.

ईडीने मला आज दुपारी 1 वाजता बोलावले होते. मात्र, ईडीचे अधिकारी इतर कामात व्यस्त होते. त्यामुळे 3 वाजता माझी चौकशी सुरू करण्यात आली. जवळपास सर्व प्रश्नांची उत्तरे ईडीला लेखी स्वरूपात देण्यात आली आहेत. काही तांत्रिक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी वेळ मागितला आहे. ईडी पुन्हा कॉल करेल तेव्हा, हजर होईल आणि तपासात सहकार्य करेल असं प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

हेही वाचा- Anil Deshmukh ED Custody: अनिल देशमुखांना तीन दिवसांची ईडी कोठडी, विशेष न्यायालयाचा निर्णय

काय आहे प्रकरण?

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यात आली आहे. महाराष्ट्र को-ओपरेटिव्ह बँकेने काही कारख्यान्यांना कर्ज दिली होती. त्यात महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेने अहमदनगर येथील राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखाना ( Ram Ganesh Gadkari Sugar Factory ) कर्ज प्रकरणात जप्त केला होता. या कारखान्याचा 2012 मध्ये लिलाव करण्यात आला होता. हा कारखाना प्राजक्त तनपुरे यांनी विकत घेतला. मूळ किंमत 26 कोटी रुपये असताना तनपुरे यांच्या कंपनीने 13 कोटी रुपयांना विकत घेतला होता. समन्स देऊन बोलावण्यात आल्यानंतर ते चौकशीसाठी हजर झाले ( Prajakt Tanpure in Mumbai ED office ) आहेत.

हेही वाचा- ED Raid : सोमैयांच्या आरोपानंतर ईडीचा अर्जुन खोतकरांच्या जालन्यातील कार्यालयावर छापा

तिसरा कारखाना संशयाच्या भोवऱ्यात

याआधीही जरंडेश्वर साखर कारखान्याच्या विक्रीवरून वाद झाल्याने राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. त्यानंतर अर्जुन खोतकरांच्या कारखान्याची चौकशी आणि आता या तिसऱ्या साखर कारखान्याचा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. प्राजक्त तनपुरेंकडून याबाबत अजून कोणती अधिकृत माहिती देण्यात आली नाही. हे नेमके प्रकरण काय आहे? हे चौकशीनंतरच स्पष्ट होईल.

कोण आहेत प्राजक्त तनपुरे?

प्राजक्त तनपुरे हे विद्यमान नगराध्यक्ष असून जनतेतून निवडून आलेले राहुरीचे पहिले नगराध्यक्ष आहेत. तनपुरे यांचे वडील प्रसाद तनपुरे हे 25 वर्षे आमदार व एकदा खासदार राहिलेले आहेत. तर त्यांची आई डॉ. उषा तनपुरे या नगराध्यक्षा राहिलेल्या आहेत. प्राजक्त हे उच्च विद्याविभूषित असून त्यांनी पुण्यातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी मिळवली आहे. तर, अमेरिकेमधून त्यांनी एम.ई ही पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. प्राजक्त हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचेदेखील आहेत.

Last Updated : Dec 8, 2021, 9:34 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.