ETV Bharat / city

आलिशान चारचाकींचे डिझाईनर दिलीप छाब्रिया यांच्या विरोधात ईडीकडून गुन्हा दाखल - ईडीकडून गुन्हा दाखल

ईडीने गुरुवारी मुंबई आणि पुण्यातील सुमारे सहा ठिकाणी छापे ( ED raids in Pune ) टाकले. मुंबई पोलिसांच्या सीआययू युनिट आणि ईओडब्ल्यूने छाब्रिया यांच्यावर नोंदवलेल्या खटल्यांच्या आधारे मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल ( money laundering case ) करण्यात आला आहे.

Dilip Chhabria
दिलीप छाब्रिया
author img

By

Published : Jul 29, 2022, 8:59 AM IST

Updated : Jul 29, 2022, 10:00 AM IST

मुंबई- डीसी मोटर्सचे मालक दिलीप छाब्रिया ( DC Motors owner Dilip Chhabria ) यांच्या विरोधात ईडीकडून मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. यासंबंधी ईडीने गुरुवारी मुंबई आणि पुण्यातील सुमारे सहा ठिकाणी छापे ( ED raids in Pune ) टाकले. मुंबई पोलिसांच्या सीआययू युनिट आणि ईओडब्ल्यूने छाब्रिया यांच्यावर नोंदवलेल्या खटल्यांच्या आधारे मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल ( money laundering case ) करण्यात आला आहे.

दिलीप छाब्रिया त्याची बहीण आणि इतरांविरुद्ध 2020 मध्ये मुंबई पोलिसांच्या क्राईम इंटेलिजेंस युनिट आणि आर्थिक गुन्हे शाखा यांनी नोंदवलेल्या प्रकरणांच्या आधारे मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप छाब्रिया डिझाईन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने काही नॉन बँकिंग वित्तीय कंपन्यांकडून कथितपणे ग्राहक म्हणून कर्ज घेतल्याचे आढळून आल्याने मुंबई पोलिसांच्या CIU पथकाने 28 डिसेंबर 2020 रोजी दिलीप छाब्रिया यांना अटक केली होती.दिलीप छाब्रिया यांच्यावर आतापर्यंत तीन गुन्हे दाखल आहेत. दोन सीआययूने आणि एक मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केलेले आहे. छाब्रियाने डीसी अवंती नावाची कार बनवली होती जी अनेक कार शोमध्ये दाखवली गेली होती आणि ती भारतातील पहिली स्पोर्ट्स कार असल्याचे म्हटले जात होते.

काय आहे प्रकरण ?छाब्रिया यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात अधिकाऱ्यांनी आरोप केला आहे की छाब्रिया यांनी काही नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन च्या अधिकार्‍यांशी संगनमत करून त्यांच्या कंपनीकडून कार खरेदी केलेल्या ग्राहकांच्या नावाचा वापर करून प्रति कार 42 लाख रुपये कर्ज घेतले आणि नंतर ते कर्ज फेडण्यात छाब्रिया अयशस्वी ठरले. ज्यामुळे NPA झालं. छाब्रिया यांचा मुलगा, बहीण आणि एनबीएफसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला देखील या प्रकरणात आरोपी करण्यात आले होते.

बीएमडब्ल्यू फायनान्सच्या अधिकार्‍यांची चौकशी-दिलीप छाब्रिया यांच्या 41 कार पैकी 25 कारचे रजिस्ट्रेशन करण्यात आलेले नव्हते. मात्र , बीएमडब्ल्यू फायनान्स कंपनीने 41 गाड्यांना तब्बल 58 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य केले असल्याचेही सीआययुच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आतापर्यंत पोलिसांकडून या प्रकरणी बी एम डब्ल्यू फायनान्स कंपनीच्या चार अधिकाऱ्यांची चौकशी झालेली आहे. यामध्ये एक आरोपी फरार आहे. दोन बीएमडब्ल्यू फायनान्स अधिकाऱ्यांना चौकशीसाठी समन्स पाठवलेले आहे. याबरोबरच बीएमडब्ल्यूच्या दोन जर्मन नागरिकांनादेखील मुंबई पोलिसांकडून यापूर्वीच समन्स पाठवण्यात आलेले आहे. हे दोन्ही जर्मन नागरिक बीएमडब्ल्यू फायनान्स संबंधित असल्याचे समोर आले आहे. बीएमडब्ल्यूच्या देगरी कार्डे व स्टीफन शिलफ्ट दोन अधिकाऱ्यांची चौकशी मुंबई पोलिसांकडून होणार आहे. आतापर्यंत मुंबई पोलिसांकडून कॅथरीन फ्रान्स वॉशर ( सीईओ) कार्स टेन पीटर स्टंप (सीएफओ) प्रशांत कपूर ( सीओओ) व सचिन महाजन या बीएमडब्ल्यू फायनान्सच्या अधिकार्‍यांची चौकशी करण्यात आलेली आहे.

असा लावला होता कपिल शर्माला चुना- दिलीप छाब्रिया यांना व्हॅनिटी व्हॅन बनवून देण्यासाठी मार्च २०१७ मध्ये कपिल शर्मा याने ५ कोटी ३० लाख रुपये दिले होते. कपिल शर्मा यांनी व्हॅनिटीच्या संदर्भात दिलीप छाब्रिया यांच्याकडे विचारपूस केली असता २०१८ मध्ये जीएसटी आल्याने ४० लाख रुपये दिल्यावर लवकरात लवकर गाडी बनवून देतो असं दिलीप छाब्रिया यांनी कपिल शर्मा यास सांगितले होते. दिलीप यांच्या म्हणण्यानुसार कपिल शर्मा याने पुन्हा एकदा २०१८ मध्ये दिलीप छाब्रिया यांना चाळीस लाख रुपये दिले होते. मात्र एवढे पैसे देऊनही कपिल शर्मा यास व्हॅनिटी व्हॅन मिळाली नाही.१२ लाखांचे पार्किंगचे बिलमात्र पैसे देऊनही व्हॅनिटी व्हॅन न मिळाल्यामुळे कपिल शर्मा याने एनसीएलटीकडे तक्रार करून डीसी कंपनीचे बँक खाते गोठवले होते. या नंतर कपिल शर्मा यांच्याकडे पुन्हा दिलीप छाब्रिया याने ६० लाख रोकड मागितले होते. कपिल शर्मा याने ६० लाख देण्यास नकार दिल्यावर दिलीप छाब्रिया यांनी कपिल शर्मा याच्या अर्धवट काम झालेल्या व्हॅनिटी व्हॅनच्या पार्किंगच्या संदर्भात १२ लाख रुपयांचे बिल पाठवले होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर यासंदर्भात कपिल शर्मा याने सप्टेंबर २०२०मध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार दिलीप छाब्रिया यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. यासंदर्भात गुरुवारी कपिल शर्मा याने मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचमध्ये येऊन आपला नोंदवला होता.

हेही वाचा-Parli Abortion Case : 10 वी पर्यंत शिक्षण, कंपाऊंडर म्हणून काम, दोन वेळा शिक्षा; तोतया डॉक्टर स्वामीचे 'प्रताप'

हेही वाचा-Petrol Diesel Rates : पेट्रोल-डिझेलच्या दरात अल्पसा चढउतार, जाणून घ्या तुमच्या शहरात किती आहेत इंधनाचे दर

हेही वाचाJayant Patil on Shinde Government : सरकारला ओबीसी आरक्षणाकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही - जयंत पाटील

Last Updated : Jul 29, 2022, 10:00 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.