मुंबई- मुंबईतील नामवंत बिल्डर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओमकार बिल्डरच्या 10 ठिकाणच्या मालमत्तांवर छापेमारी करण्यात आलेली आहे. यामध्ये 7 निवासी जागा तर तीन कार्यालयांवर ईडी कडून छापेमारी करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. विविध बॅंकांकडून घेतलेले कर्ज व आर्थिक अनियमितता यासंदर्भातही छापेमारी करण्यात आल्याचे ईडी सूत्रांकडून कळत आहे.
मुंबईतील नेपियन्सी रोड परिसरातील आशियाना इमारत, सायन परिसरातील ओमकार बिल्डरचे कार्यालय व प्रभादेवी परिसरातील ब्युमोंट अपारमेंट सारख्या ठिकाणी सध्या छापेमारी करण्यात आलेली आहे. या छापेमारी दरम्यान ओमकार डेव्हलपरकडून विविध बँकांकडून घेण्यात आलेल्या कर्जांच्या संदर्भातील कागदपत्र व विविध बँकांतील आर्थिक व्यवहार तपासले जात आहेत. यामध्ये ओमकार डेव्हलपर्सशी संबंधित काही व्यक्तींची चौकशी सध्या सुरू आहे.
जेपी इन्फ्रास्ट्रक्चरवर झाली आहे कारवाई-
काही दिवसांपूर्वी इडीकडून अशाच प्रकारची छापेमारी जेपी इन्फ्रास्ट्रक्चरच्या कार्यालयांवर करण्यात आलेली होती, जे इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये उत्तर प्रदेश मधील एका मोठ्या नेत्याचा पैसा गुंतवण्याचा संशय तपास यंत्रणांना असून यासंदर्भात इन्कम टॅक्सकडून सुद्धा छापेमारी करण्यात आल्याचे कळत आहे.
ओमकार बिल्डरच्या कार्यालयांवर ईडीची छापेमारी; आर्थिक अनियमिततेमुळे कारवाई
या छापेमारी दरम्यान ओमकार डेव्हलपरकडून विविध बँकांकडून घेण्यात आलेल्या कर्जांच्या संदर्भातील कागदपत्र व विविध बँकांतील आर्थिक व्यवहार तपासले जात आहेत. यामध्ये ओमकार डेव्हलपर्सशी संबंधित काही व्यक्तींची चौकशी सध्या सुरू आहे.