ETV Bharat / city

प्रताप सरनाईकांच्या लोणावळ्यातील रिसॉर्टवर ईडी-सीबीआयची धाड

मनी लाँड्रींगसंदर्भात गुन्हा नोंदविण्यात आलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या लोणावळा स्थित रिसॉर्टवर सीबीआय व ईडी कडून छापेमारी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. ईडी व सीबीआयने संयुक्तरित्या ही कारवाई केल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

प्रताप सरनाईकांच्या लोणावळ्यातील रिसॉर्टवर ईडी-सीबीआयची धाड
प्रताप सरनाईकांच्या लोणावळ्यातील रिसॉर्टवर ईडी-सीबीआयची धाड
author img

By

Published : May 18, 2021, 1:53 PM IST

Updated : May 18, 2021, 3:45 PM IST

लोणावळा - शिवसनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्या बंगल्यावर इडीने छापा टाकला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाळी आहे. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणामुळे शिवसेनेचे प्रवक्ते तथा आमदार प्रताप सरनाईक ईडीच्या रडारवर असून त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

आर्थिक गैरव्यवहारांबाबत ईडीकडून चौकशी -

शिवसनेचे प्रताप सरनाईक यांच्या लोणावळा येथील बंगल्यावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच ईडीचे अधिकारी सरनाईक यांच्या बंगल्यावर दाखल झाले असून टॉप्स ग्रुप (सिक्युरीटी) कंपनीच्या आर्थिक गैरव्यवहारांबाबत ईडीकडून चौकशी केली जात आहे. अद्याप तरी बंगल्यात संबंधित अधिकाऱ्यांनी प्रवेश केला नसून केवळ बाहेरील सीसीटीव्ही तपासला असल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा - यूपी सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या दाव्यांची 'ईटीव्ही भारत'कडून पोलखोल..

Last Updated : May 18, 2021, 3:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.