मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम च्या संदर्भातील तपास केंद्रीय गृहमंत्रालयाने यांना NIA ला 15 दिवसांपूर्वीच देण्यात आला होता. तपासादरम्यान येना गेला काही महत्त्वाच्या गोष्टी आढळून आल्यानंतर आज पहाटे चार वाजल्यापासून ईडीने दाऊद इब्राहिम च्या निकटवर्तीय असलेल्या लोकांवर 10 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. यामध्ये मुंबईतील ९ तर ठाण्यातील एका ठिकाणी छापे मारण्यात आलेत. त्यामध्ये मुंब्र्यातील एका ठिकाणाचाही समावेश आहे. या संदर्भातील ईडीकडून सर्च मोहीम सुरू असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही आहे. मात्र या गोष्टीकडे दृष्ट्या देखील करण्यात येत आहे शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत आज पत्रकार परिषद घेऊन राजकीय भूकंप करणार असल्याचे भाकीत केले होते. त्यानंतर लगेच आज पत्रकार परिषदेच्या काही तासापूर्वी पेमारे केल्याने या छापेमारी चे राजकीय चर्चा देखील सुरू आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम चा जवळचा असलेला छोटा शकीलच्या नातेवाईकाला ईडीने घेतले ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.
अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांच्या जागांवर छापे टाकण्यात येत आहेत. इकबाल कासकर आणि हसिना पारकर यांच्याशी संबंधीत काही मालमत्तांवर ही कारवाई सुरू असल्याचं समजतंय. मुंबईतील मोठे नेते देखील ईडीच्या रडारवर असल्याचं समजतंय. फक्त महाराष्ट्र आणि मुंबईच नाही तर दिल्लीतून देखील तपास पथक मुंबई आल्याचे समजते. संपत्ती कराराबाबत ईडीने धाडी टाकल्या आहेत. अंडरवर्ल्डचा या करारामध्ये पैसा असल्याच्या संशयावरून ही कारवाई केली जात असल्याची चर्चा आहे. ईडी आणि एनआयएला ठोस पुरावे मिळाल्यानं या छापे टाकल्या जात आहेत. यामध्ये मोठ्या राजकीय नेत्यांचा समावेश असल्याचंही समोर येत आहे. शिवसेनेच्या पत्रकार परिषदेपूर्वी ED ची ही कारवाई होत असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
-
ED officials visit the residence of Dawood Ibrahim's sister Haseena Parkar in Mumbai pic.twitter.com/HMSDzqPorz
— ANI (@ANI) February 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">ED officials visit the residence of Dawood Ibrahim's sister Haseena Parkar in Mumbai pic.twitter.com/HMSDzqPorz
— ANI (@ANI) February 15, 2022ED officials visit the residence of Dawood Ibrahim's sister Haseena Parkar in Mumbai pic.twitter.com/HMSDzqPorz
— ANI (@ANI) February 15, 2022
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकूण सहा मालमत्तांची चौकशी सुरू आहे. या मालमत्तांचा संबंध काही राजकीय नेते, 1993 बॉम्ब स्फोटातील आरोपी, हसिना पारकर यांच्याशी संबंध असल्याची माहिती समोर येत आहे. या धाडसत्रात एनआयएच्या टीमचीही तपासात मदत घेतली जात असल्याची माहिती समोर येत आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती आणि महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांमध्ये झालेल्या काही जागांच्या व्यवहारांबाबत हे धाडसत्र सुरू असल्याचं बोललं जात आहे. मात्र या संदर्भात अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. तसेच हा राजकीय नेता कुठल्या पक्षाचा आहे आणि कोण आहे याबाबतही कुठलीही अधिकृत माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी थेट केंद्रीय तपास यंत्रणांना आव्हान दिलं आहे. तसेच भाजप नेत्यांबाबत गौप्यस्फोट करण्यासाठी आज एका पत्रकार परिषदेचे आयोजन केलं आहे. त्यामुळे आता मुंबईत ईडीच्या टीमकडून सुरू असलेल्या धाडी आणि शिवसेनेची ही पत्रकार परिषद यात काही संबंध आहे का? असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. संजय राऊत आज पत्रकार परिषद घेऊन राजकीय भूकंप करणार असल्याचे भाकीत केले होते त्यानंतर लगेच आज पत्रकार परिषदेच्या काही तासापूर्वी ईडी केलेल्या या छापेमारी चे राजकीय चर्चा देखील सुरू आहे.