ETV Bharat / city

ईटीव्ही भारत विशेष: कोरोना संक्रमण टाळण्यासाठी 'वृक्ष गणेशा'ची संकल्पना

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता गणेश विसर्जनाच्या दिवशी समुद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच लोकांना घरच्या घरीच गणपती मूर्तीचे विसर्जन करता यावे, यादृष्टिकोणातून 'वृक्ष गणेशा' ही संकल्पना राबवल्याचे 'श्री आर्ट गणेश'चे किरण देवरे यांनी सांगितले.

वृक्ष गणेशा
वृक्ष गणेशा
author img

By

Published : Aug 18, 2020, 4:04 PM IST

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वरळीतील श्री आर्ट गणेश कार्यशाळेने गार्डनच्या मातीपासून पर्यावरणपूरक गणपती साकारला आहे. यासोबतच मूर्ती विसर्जनासाठी नैसर्गिक खताने भरलेले भांडे देण्यात येत आहे, त्यामुळे या 'वृक्ष गणेशा' संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

'वृक्ष गणेशा' संकल्पना

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता गणेश विसर्जनाच्या दिवशी समुद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच लोकांना घरच्या घरीच गणपती मूर्तीचे विसर्जन करता यावे, यादृष्टिकोणातून 'वृक्ष गणेशा' ही संकल्पना राबवल्याचे 'श्री आर्ट गणेश'चे किरण देवरे यांनी सांगितले. पर्यावरणपूरक गणेशा बरोबरच खताने भरलेले भांडे ग्राहकाना देण्यात येते, या खताच्या भांड्यात नंतर गणपती मूर्ती विसर्जित करून त्यात बीज पेरून वृक्ष लागवडीचा आनंद देखील ग्राहकांना घेता येणार आहे.

हेही वाचा - मंडळी पाहिलात का? सॅनिटायझर फवारणी करणारा बाप्पा..!

9 ते 12 इंचापर्यंत गणपती मूर्ती विक्री साठी ठेवण्यात आली असून या खताच्या भांड्यात 3 ते 4 तासात मूर्तीचे विघटन होऊ शकते. यामुळे बाहेर न जाता घरच्या घरीच मूर्तीचे विसर्जन होऊ शकते. शिवाय कोरोनाच्या प्रादुर्भावापासून देखील बचाव होऊ शकतो. याचबरोबर वृक्षाने बहरलेले सुंदर असे फोम पासून बनविलेले पर्यावरणपूरक मखर देखील उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात गणेशाचे आगमन झाल्याचा आभास निर्माण होतो.

हेही वाचा - शिक्षण हक्क कायद्याची शाळांकडून पायमल्ली; बेसुमार शुल्कवसुली, तर 81 हजाराहून अधिक प्रवेश नाकारले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.