मुंबई - निवडणूक म्हटलं की आरोप प्रत्यारोप, भाषणे आलीच. भाषण करताना अनेकजण नको ते भाषण करतात. असेच प्रक्षोभक भाषण केल्याने भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे.
हेही वाचा - महाराष्ट्राच्या प्रचार मैदानातून सोनियांची माघार?
मिळालेल्या माहितीनुसार, 16 ऑक्टोबरला मंगलप्रभात लोढा यांनी युतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी एका रॅलीमध्ये भाषण केले होते. या भाषणामध्ये त्यांनी प्रक्षोभक काही वक्तव्य केली. लोढा यांच्या या वक्तव्यांना निवडणूक आयोगाने आक्षेप नोंदवला आहे. त्यासाठी मुंबादेवी मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी लोढा यांना नोटीस बजावली. नोटीसच्या अनुषंगाने लोढा यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. स्पष्टीकरण योग्य नसल्यास त्यांच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते. मंगलप्रभात लोढा हे मुंबईमधील नावाजलेले बिल्डर आहेत. ते भाजपचे मुंबई अध्यक्ष असून ते स्वत: सुद्धा मलबार हिल या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.