ETV Bharat / city

Dust Storm : पाकिस्तानातल्या धुळीच्या वादळाचा महाराष्ट्राला फटका, मुंबई, पुण्यात हवेची गुणवत्ता खराब - पाकिस्तानातील धुळीचे वादळ

पाकिस्तानात आलेल्या धुळीच्या वादळाचा मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील काही भागांना फटका बसत ( Pakistani Dust Storm In Maharashtra ) आहे. धुळीच्या वादळामुळे मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरात हवेची गुणवत्ता खराब झाली असून, हवामान तज्ज्ञांनीही इशारा दिला आहे.

पाकिस्तानातल्या धुळीच्या वादळाचा महाराष्ट्राला फटका, मुंबई, पुण्यात हवेची गुणवत्ता खराब

author img

By

Published : Jan 23, 2022, 5:15 PM IST

मुंबई / पुणे - पाकिस्तानच्या कराचीत नुकतेच आलेल्या धुळीच्या वादळाने ( Dust Storm In Pakistan ) मुंबई आणि पुण्यात वातावरण बदलले आहे. सकाळपासून मुंबईतील हवेत मळभ आणि धूळ दिसून येत आहे. तर पुण्यातही काहीशी अशीच परिस्थिती आहे. गेल्या काही दिवसांपासून निसर्गाने थंडी पावसाची बरसात सुरु केली आहे. गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रासह देशभरात कुठे दाट धुके, कुठे अवकाळी पाऊस तर कुठे कडाक्याची थंडी पडत आहे. आज तर पाकिस्तानातून सुटलेले वादळ महाराष्ट्रावर धडकले ( Pakistani Dust Storm In Maharashtra ) आहे. पण राज्यासह पुण्यात असलेले हे धुळीचे वादळ नसून धुळीकरण असल्याचे हवामानतज्ज्ञ सांगत आहेत. अशी परिस्थिती आगामी 24 तास अशीच असणार असून, अधून मधून एप्रिलपर्यंत अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. याचा परिणाम हा मानवी आजार आणि शेतीतील पिकांवर देखील मोठ्या प्रमाणावर होणार आल्याची माहिती हवामान तज्ञ डॉ.रामचंद्र साबळे यांनी पुण्यात दिली. मुंबई शहरामधील अनेक भागात दृश्यमानता अतिशय कमी झाले ( Low Visibility In Mumbai ) आहे. विशेष म्हणजे मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक १८० वर आहे. तर माझगाव आणि मालाडमध्ये हवेची गुणवत्ता अतिखराब श्रेणीत गेल्यामुळे चिंतेच वातवरण निर्माण झाले आहे.

पाकिस्तानातल्या धुळीच्या वादळाचा महाराष्ट्राला फटका, मुंबई, पुण्यात हवेची गुणवत्ता खराब

प्रदूषण पातळी वाढली

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या कराचीत नुकतेच धुळीचे वादळ आले आहे. आता हे वादळ गुजरात आणि राजस्थानच्या दिशेने येत असल्याने धुळीच्या वादळामुळे हवामानात मोठा बदल घडत असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानमधील धुळीच्या वादळाचा मुंबईतील वातावरणावर मोठा परिणाम दिसून येत आहे. मुंबईतील वातावरणात सकाळपासून मळभ आणि धूळ दिसून येत आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झालेले पाहायला मिळत आहेत.

माझगाव- मालाडमधील हवा खराब

मुंबई, पुणे, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक आणि हलक्या सरी कोसळण्याची शक्यता काल हवामान विभागाने वर्तवली होती. काल मुंबईतील अनेक भागात पावसाचा हलक्या सरी सुद्धा कोसळल्या होत्या. विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील हवामानात बदल दिसून येत आहे. त्यातच आता धुळीच्या वादळचा फटका मुंबईकरांना बसत आहे. आज सकाळी मालाड आणि माझगावमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक 300 पार झाला आहे. दोन्ही ठिकाणी हवेची गुणवत्ता अतिखराब श्रेणीत मोडत आहे. मालाडमध्ये एक्यूआय 316 तर माझगावमध्ये 315 एक्यूआय आहे.

दृश्यमानता अतिशय कमी

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झालेले पाहायला मिळत आहेत. सकाळपासून मुंबईतील आणि आसपासच्या शहरांमधील दृश्यमानता अतिशय कमी, हवेमध्ये धुळीचे कण मिसळल्याने हवा प्रदूषित झाली आहे. विशेष म्हणजे आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने मुंबईकर घराबाहेर पडतात. मात्र, आजच्या ढगाळ आणि प्रदूषित वातावरणामुळे अनेक नागरिक स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत घरीच आहेत.

धुळीकरण अधून- मधून एप्रिलपर्यंत असणार

प्रशांत महासागरातील पुष्टभागातील तापमान हे उणे एक अंश किंवा उणे 2 अंश झाले आहे. गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून ते पुढे एप्रिलपर्यंत ते तसेच असणार आहे. जो पर्यंत ही परिस्थिती आहे तोपर्यंत अरबी समुद्र आणि हिंदी महासागर येथील बाष्प भारताच्या दिशेने येत आहे. ते बाष्प जेव्हा येत असतात तेव्हा हवेतील बाष्प धुळीवर चिटकले की ते कण हवेत असेच लटकते राहतात. त्यालाच आपण धुके म्हणत असतो. अशी परिस्थिती अधून मधून एप्रिलपर्यंत राहणार आहे. अधून मधून पावसाचं देखील वातावरण निर्माण होऊ शकत, असं देखील यावेळी डॉ. साबळे म्हणाले.

धुळीकरणामुळे मोठ्या प्रमाणात होणार नुकसान

सध्या जे काही धुळीकरण आहे ते येत्या 24 तास असच असणार आहे. पून्हा वातावरणात बदल होणार आहे. त्याचे परिणाम मानवी आरोग्य, पिकं, शेती यावर होणार असून, याला प्रमुख कारण हे फक्त वातावरणीय बदल आहे. याची खबरदारी घेतली पाहिजे, असं देखील यावेळी रामचंद्र साबळे म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.