मुंबई - गेल्या तीन आठवड्यांपासून एसटी कर्मचारी संप (st employee strike) सुरू असल्याने यात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाकडून जोरदार कारवाई करण्यात आली आहे. आता या संपामुळे एसटी महामंडळातील कंत्राटी कामगारांनासुद्धा मोठा फटका बसला असून, २ हजार २९६ रोजंदारी कामगारांना सेवा समाप्तीच्या नोटीस एसटी महामंडळाकडून बजावण्यात (st employee service termination notice) आल्या आहे. त्यामुळे, आता कारवाईचा आकडा हा ४ हजार ३४९ वर गेला आहे.
हेही वाचा - पुढील पाच दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता; 13 जिल्ह्यात अलर्ट
दोन हजार रोजंदारी कर्मचाऱ्यांवर कारवाई -
एसटी महामंडळ विलिनीकरणाच्या मागणीवरून सुरू असलेला संप आता चांगलाच चिघळला आहे. न्यायालयाचे निर्देश असताना सुद्धा कामगार संपावर (st workers strike) गेल्यामुळे एसटी महामंडळाने कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत महामंडळाकडून २ हजार ५३ एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. आता याच पाठोपाठ एसटी महामंडळात रोजंदारीने काम करणाऱ्या २ हजार २९६ कर्मचाऱ्यांना सुद्धा सेवा समाप्तीची नोटीस बजावली आहे. ज्यामध्ये चालक २५, चालक तथा वाहक २ हजार १०१, वाहक १३२, सहाय्यक २२ आणि लिपिक टंकलेखक १६, असे २ हजार २९६ रोजंदारी कामगारांना सेवा समाप्तीचा नोटीस बजावली आहे.
आमचा काय गुन्हा?
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी नसताना सुद्धा रोजंदार कामगारांवर एसटी महामंडळाकडून कारवाई करण्यात आली आहे. मात्र, रोजंदारी कामगार कर्त्यव्यावर येत असताना काही आंदोलकांकडून मारहाणीचा आणि अपमानित करण्याचे प्रकार सुरू आहे. यामुळे अनेक रोजंदारी कामगार कामावर हजर होत नाही. एसटी रोजंदारी कर्मचारी कामावर येण्यास तयार आहे. त्यांनाही पोलीस संरक्षण देण्याची कबुली एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात पोलिसांचे संरक्षण मिळत नाही. याबाबत तक्रारी केल्यावर सुद्धा एसटीचे अधिकारी ऐकत नाही. आता २ हजार २९६ रोजंदारी कामगारांना चक्क सेवा समाप्तीच्या नोटीस बजावल्या जात आहे. यात आमचा काय गुन्हा? असा प्रश्न एक रोजंदारी एसटी कर्मचाऱ्यांने ईटीव्ही भारताशी बोलताना महामंडळाला विचारला.
२०५३ एसटी कर्मचारी निलंबन (st employee suspend)
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करा, या प्रमुख मागणीसाठी गेल्या दोन आठवड्यांपासून एसटी कर्मचारी संपावर (msrtc strike) गेले आहे. हा संप फोडण्यासाठी एसटी महामंडळाने निलंबनाची कारवाई सुरू केली होती. आतापर्यंत २ हजार १७८ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. ज्यामध्ये ९ नोव्हेंबरला ३७६ कर्मचारी, ९ नोव्हेंबरला ५४२ आणि नंतर १ हजार १३५ असे आतापर्यंत २ हजार १७८ एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईच्या धास्तीने कामावर परतणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. मात्र, आता एसटी महामंडळाने रोजंदारीवर काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे.
रोजंदारी कामगारांची संख्या -
चालक - २९
चालक तथा वाहक - २१८८
वाहक १८२
सहाय्यक ९७
लिपिक- टंकलेखक ८८
हेही वाचा - अभिनेत्री कंगनाचे महात्मा गांधींबद्दलचे विधान अयोग्यच - प्रवीण दरेकर