ETV Bharat / city

मुलींना इम्प्रेस करण्यासाठी पोलीस झालेला तोतया लोहमार्ग पोलिसांच्या जाळ्यात

सीएसएमटी स्थानकावर एक तरुण चक्क मुलींना इम्प्रेस करण्यासाठी तोतया पोलीस झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे.

chhatrapati shivajimaharaj terminus
chhatrapati shivajimaharaj terminus
author img

By

Published : Mar 18, 2021, 4:56 PM IST

Updated : Mar 18, 2021, 5:15 PM IST

मुंबई - राज्यात तोतया पोलिसांचा सुळसुळाट दिसून येत आहे. पोलिसांच्या गणवेश घालून वावरत असतात आणि त्यांना पकडल्यानंतर त्याची कारणेही समोर येतात. त्यात पैसे मिळवण्यासाठी, लुबाडण्यासाठी किंवा इतर कारणासाठी. पण सीएसएमटी स्थानकावर एक तरुण चक्क मुलींना इम्प्रेस करण्यासाठी तोतया पोलीस झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे.

काय आहे प्रकरण?

मध्य रेल्वेचे वरिष्ठ तिकीट तपासणी राजेश करलकर यांनी ईटीव्ही भारतला सांगितले, की सीएसएमटी रेल्वे स्थानकावर कर्तव्यावर असताना एक अनोळखी इसम पोलीस उपनिरीक्षकाचा पोषाख घालून सीएसएमटी रेल्वे स्थानकावर चकरा मारत होता. त्याच्यावर माझी नजर पडली. तेव्हा मी त्याचा पाठलाग करत त्याच्यावर लक्ष ठेवून होतो. तेव्हा तो रेल्वे कर्मचाऱ्यांशी बोलून मैत्री करण्याचा प्रयत्न करत होता. इतकेच नव्हे तर महिला प्रवाशांकडे बघत होता. त्याच्या या कृतीवर मला संशय आला. त्यानंतर मी त्याला तिकीट आणि पोलीस ओळखपत्राची विचारणा केली. त्याने तिकीट आणि ओळखपत्र नसल्याचे सांगितले. त्यानंतर याची तक्रार सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांकडे केली. त्यानंतर पोलिसांनी या आरोपीला अटक केली.

कोल्हापुरातून घेतला पोषाख

लोहमार्ग पोलिसांनी आरोपीकडे विचारपूस आणि चौकशी केली असता, त्याने त्याचे नाव नीलेश सुरेश चव्हाण सांगितले. आरोपी मूळचा सातारा जिल्ह्यातील वडगाव हवेली गावातील रहिवासी आहे. पोलिसांनी आरोपीला सदर पोलीस उपनिरीक्षक गणवेशाबद्दल विचारपूस केली असता आरोपीने साडेतीन महिन्यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीसलाइन बावडातील एका टेलरकडून हा गणवेश विकत घेतल्याची कबुली दिली आहे. आरोपी नीलेश चव्हाण याने मुलींवर इम्प्रेशन मारण्यासाठी पोलिसाचा गणवेश घातल्याचे जबाबात म्हटले आहे. त्याला भादंवि कलम 420, 170, रेल्वे कायदा कलम 147नुसार अटक करण्यात आली आहे.

4 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त

शासकीय नोकराचा गणवेश परिधान करून, शासनाची फसवणूक केल्याविरोधात आरोपीवर गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. तसेच त्याच्याकडून 2 हजार 800 रुपये किंमतीचा पोलीस उपनिरीक्षकपदाचा पोशाख आणि नेमप्लेट, लाल रंगाचा बेल्ट आणि 1 हजार 600 रुपयांच्या एक लाल रंगाचा पोलीस शूज जप्त केला आहे. या सर्व जप्त केलेल्या वस्तूची किंमत 4 हजार 400 रुपयांची आहे.

प्रवाशांना सावधानतेचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात तोतया पोलिसांचा सुळसुळाट झाला आहे. यापूर्वीसुद्धा नकली टीसी पोलीस शिपाई यांना विनातिकीट प्रवास करताना पकडण्यात तिकीट तपासणीसांना यश आले आहे.

Last Updated : Mar 18, 2021, 5:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.