ETV Bharat / city

Union Budget 2022 : आजच्या बजेटमुळे मोदी सरकारची जुमलेबाजी स्पष्ट : नवाब मालिकांची टीका - नवाब मालिकांची टीका

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ( Finance Minister Nirmala Sitharaman ) यांनी आज संसदेत अर्थसंकल्प ( Union Budget 2022 ) जाहीर केला. यावर करण्यात आलेल्या तरतुदींवरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी बजेट म्हणजे मोदी सरकारची जुमलेबाजी आहे, असे म्हणत टीका ( Nawab Malik Criticized Modi Government ) केली आहे.

आजच्या बजेटमुळे मोदी सरकारची जुमलेबाजी स्पष्ट : नवाब मालिकांची टीका

author img

By

Published : Feb 1, 2022, 3:59 PM IST

मुंबई - आज सादर झालेल्या बजेटनंतर ( Union Budget 2022 ), पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले आश्वासन म्हणजे केवळ जुमलेबाजी होते हे स्पष्ट झालं, असल्याचा टोला अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला ( Nawab Malik Criticized Modi Government ) आहे.

आजच्या बजेटमुळे मोदी सरकारची जुमलेबाजी स्पष्ट : नवाब मालिकांची टीका

अर्थमंत्र्यांनी जुमलेबाजी सिद्ध केली

अर्थमंत्री निर्मला सीतारमण ( Finance Minister Nirmala Sitharaman ) यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांनी केलेल्या घोषणा या जुमलेबाजी असल्याचे सिद्ध करत आहेत. सत्तेवर येण्याआधी दोन कोटी तरुणांना दरवर्षी नोकर्‍या दिल्या जातील असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देण्यात आले होते. मात्र आज बजेट सादर करत असताना गेल्या तीन वर्षात केवळ 60 लाख नोकऱ्या निर्माण झाल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. यावरून दोन कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन म्हणजे केवळ जुमलेबाजी होतं हे सिद्ध झालं असल्याचा टोला राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.

बजेट देशाचं की आयटी विभागाचं?

बजेटमध्ये 80 लाख घर बांधण्याबाबत अर्थमंत्र्यांनी घोषणा केली. मात्र 2022 पर्यंत देशातल्या प्रत्येक नागरिकाच पक्क घर असेल असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले होतं. तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू असे देखील आश्वासन मोदी यांनी दिल होत. आज सादर झालेल्या अर्थसंकल्पातून सामान्य नागरिकांना तर दिलासा मिळालाच नाही. कोणालाही या अर्थसंकल्पातून दिलासा मिळालेले नसून, केवळ तंत्रज्ञानाच्या आधारावर असलेल्या हे बजेट आहे. त्यामुळे हे देशाचं बजेट आहे, का ? आयटी विभागाचे बजेट आहे? अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.