ETV Bharat / city

नागरिकांच्या सहकार्यामुळे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५० दिवसांवर - मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५० दिवसांवर

मुंबईमधील कोरोनाचा प्रसार रोखण्यात पालिकेला यश येत असून रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी वाढत आहे. 'चेस द व्हायरस', ट्रेसिंग - ट्रॅकींग - टेस्टींग - ट्रिटिंग या चार 'टी' चतु:सूत्रीनुसार सुरू असलेली कार्यवाही, मिशन झिरो, घरोघरी जाऊन करण्यात येणारी रुग्णांची तपासणी आणि त्याला मुंबईकर नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद यामुळे सुमारे चार महिन्याच्या कालावधीनंतर मुंबईमधील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५० दिवसांवर पोहचला आहे.

period of doubling of the patient
रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी
author img

By

Published : Jul 11, 2020, 8:03 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये मार्चपासून कोरोनाचे रुग्ण आढळून यायला लागले. मार्चमध्ये कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी तीन दिवस होता. 'चेस द व्हायरस', ट्रेसिंग - ट्रॅकींग - टेस्टींग - ट्रिटिंग या चार 'टी' चतु:सूत्रीनुसार सुरू असलेली कार्यवाही, मिशन झिरो, घरोघरी जाऊन करण्यात येणारी रुग्णांची तपासणी आणि त्याला मुंबईकर नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद यामुळे सुमारे चार महिन्याच्या कालावधीनंतर मुंबईमधील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५० दिवसांवर पोहोचला आहे. तर रुग्ण वाढीचा वेग देखील १. ७२ टक्क्यांवरुन १.३९ टक्क्यांवर आला आहे.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील रुग्ण दुप्पट होण्याच्या दिवसांमध्ये सकारात्मक वाढ सातत्याने नोंदविली जात आहे. २२ मार्च रोजी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा केवळ ३ दिवस होता. जो १५ एप्रिल रोजी ५ दिवस, १२ मे रोजी १० दिवस, २ जून रोजी २० दिवस, १६ जून रोजी ३० दिवस, २४ जून रोजी ४१ दिवस नोंदविण्यात आला होता. तर १० जुलै रोजी हा कालावधी तब्बल ५० दिवसांवर पोहोचला आहे. वांद्रे पूर्व - खार पूर्व - सांताक्रूज पूर्व इत्यादी परिसरांचा समावेश असलेल्या 'एच पूर्व' विभागात १३४ दिवस एवढा झाला आहे. तर या खालोखाल मशीद बंदर - सँडहर्स्ट रोड या रेल्वे स्थानकांजवळच्या परिसराचा समावेश असलेल्या 'बी' विभागात ९८ दिवस; कुर्ला परिसराचा समावेश असलेल्या 'एल' विभागात ८८ दिवस; दादर ट्राम टर्मिनस, वडाळा - माटुंगा - शीव इत्यादी परिसराचा समावेश असलेल्या 'एफ उत्तर' विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ७९ दिवस एवढा झाला आहे. उर्वरित २० विभागांपैकी १० विभागांमध्ये हा कालावधी ५० दिवसांपेक्षा अधिक आहे.

२४ जून रोजी बृहन्मुंबई महापालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांमध्ये रुग्ण दुपटीचा किमान कालावधी हा २० दिवस होता; हा कालावधी आता किमान २७ दिवसांवर आला आहे. 'चेस द व्हायरस', ट्रेसिंग - ट्रॅकींग - टेस्टींग - ट्रिटिंग या चतु:सूत्रीनुसार सुरू असलेली कार्यवाही, मिशन झिरो, घरोघरी जाऊन करण्यात येणारी रुग्णांची तपासणी, मुंबई पोलीसांच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना; यासारख्या विविध बाबींचे नियोजन व व्यवस्थापन महापालिकेद्वारे सुव्यवस्थितपणे करण्यात येत आहे. त्याचबरोबर बाधित किंवा संशयित रुग्णांवर अधिक परिणामकारक वैद्यकीय उपचारांच्या दृष्टीने महापालिकेने आपल्या ४ प्रमुख सर्वोपचार रुग्णालयांसह १६ उपनगरीय रुग्णालयांमध्ये समर्पित सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. तसेच बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील विविध सार्वजनिक रुग्णालयांमध्ये व खासगी रुग्णालयांमध्ये देखील वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त विविध संस्थांच्या सहकार्याने तात्पुरत्या स्वरुपात १० ठिकाणी उभारलेल्या कोव्हिड समर्पित उपचार केंद्रांच्या माध्यमातून (जम्बो फॅसिलिटी) देखील वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. याचा परिणाम म्हणून मुंबईमधील कोरोनाचा प्रसार रोखण्यात पालिकेला यश येत असून रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी वाढत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.