मुंबई - गुंतवणूकदारांचे 1200 कोटी बुडविणाऱ्या डीएसके म्हणजेच दिपक कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयात 'ईडी'कडून जप्त करण्यात आलेल्या पुण्यातील बंगला भाड्याने मिळावा म्हणून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. डीएसके यांचे पुणे येथील किर्तीतवाल येथील डीएसके विश्वमध्ये 503 चौ.मीटर जागेवर 355 चौ मीटरचा तब्बल 1 कोटींचा बंगला आहे. हा बंगला आपल्याला दरमहा साडे तीन लाख रुपये दराने भाड्याने मिळावा म्हणून उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
हेही वाचा - आरे वृक्षतोडीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकारच
दरम्यान, या आगोदर डीएसके यांना सत्र न्यायालयाने या बंगल्यात राहायचं असल्यास बाजारभावाप्रमाणे 11 लाख रुपये दर महिना भाडे द्यावे लागेल, असे सांगितले होते. हे मान्य असल्यास 10 दिवसांची मुदत न्यायालयाने दिली होती. ही मुदत 25 सप्टेंबरला संपली त्यामुळे 30 तारखेला 'ईडी'ने बंगला ताब्यात घेतला. या नंतर डीएसके कुटुंबीयांना राहण्यास जागा नसल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या संदर्भात येत्या शुक्रवारी ईडीला आपले उत्तर देण्यास उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत.
हेही वाचा - मुंबई सेंट्रलसह महालक्ष्मी परिसरात गुरुवारी पाणीकपात