ETV Bharat / city

महाराष्ट्रात फडणवीसांच्या इशाऱ्यावरच ड्रग्जचा धंदा; नवाब मलिकांचा गंभीर आरोप - नवाब मलिक पत्रकार परिषद

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंच्या कार्यपद्धतीवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. याच दरम्यान त्यांनी अनेक गौप्यस्फोटही केले होते. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप लावले आहे.

nawab news
nawab news
author img

By

Published : Nov 1, 2021, 9:31 AM IST

Updated : Nov 1, 2021, 9:59 AM IST

मुंबई - विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर मुंबईत ड्रग्जचा खेळ सुरु होता, असा गंभीर आरोप राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी आज (सोमवार) अमृता फडणवीस यांचा एक फोटो ट्विट करत 'या' ड्रग्स पेडलरचं भाजपसोबत कनेक्शन काय? असा सवाल केला आहे. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मलिक यांनी अमृता यांच्यासोबतची फोटोमधील व्यक्ती ही जयदीप राणा असल्याचे सांगतीले. तसेच जयदीप राणा हा ड्रग्ज ट्राफिकिंगमध्ये सध्या तुरुंगात असून या ड्रग्ज माफियासोबत फडणवीसांचे संबंध असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.

काय म्हणाले नवाब मलिक -

जयदीप राणा या व्यक्तीचा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता यांच्या सोबतचा फोटो असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले आहे. जयदीप राणा हा तुरुंगात असून त्याला ड्रग्ज ट्राफिकिंगमध्ये अटक झाल्याचे मलिक यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांची पत्नी अमृता यांनी नदी संवर्धनासाठीचे गाणे गायले होते. त्या गाण्यावर तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता यांनी अभिनय केला होता. त्यासोबतच तत्कालिन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही अभिनय केला होता, त्याचा उल्लेख करुन मलिक म्हणाले, त्या गाण्याचा फायनान्सर हा जयदीप राणा होता. जयदीप राणासोबत अमृता यांचे फोटो आहेत. हे फोटो सार्वजिनक कार्यक्रमात लोक भेटतात असा फोटो नाही. तर ते एकमेकांना ओळखत असल्याच्या खून करत काढलेला हा फोटा असल्याचा दावा मलिक यांनी केला. फडणवीस यांच्याच काळात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची बदली झाल्याचेही मलिक म्हणाले. मुंबईत ड्रग्जचा गोरख धंदा वाढवण्यासाठीच वानखेडे यांना एनसीबीमध्ये आणले गेले का? असाही प्रश्न उपस्थि होत असल्याचे मलिक म्हणाले आहेत.

अरुण हलदर यांचा व्यवहार दुर्दैवी -

आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष अरुण हलदर यांनी समीर वानखेडेंच्या घरी जाऊन घेतलेल्या भेटीवरही आक्षेप नोंदवला. एक संविधानीक पदावर असलेला व्यक्ती हा समीर वानखेडेंच्या घरी जाऊन ट्विट करतो हे दुर्दैवी मलिकांनी म्हटले. तसेच या प्रकाराची राष्ट्रपतींकडे तक्रार करणार असल्याचेही ते म्हणाले.

'निरज गुंडे याच्याशीही देवेंद्र फडणवीसांचे संबंध' -

निरज गुंडे याच्याशीही देवेंद्र फडणवीस यांचे संबंध असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. फडणवीस मुंबईत येताना निरज गुंडे याच्या घरी हजरे लावतात. निरज गुंडेला तत्कालिन मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये थेट जायला परवानगी होती. सगळ्या विभागाच्या सेक्रेटरींच्या ऑफिसमध्ये त्याचे जाणे-येणे होते. वर्षा बंगल्यावरही जायचा. असे नवाब मलिकांनी म्हटले आहे. क्रुज ड्रग्ज प्रकरणात काशिफ खान, प्रतिक गाबा, सारख्या बड्या ड्रग्ज माफियांना सोडले गेले, असाही आरोप मलिक यांनी केला आहे. येणाऱ्या काळात प्रतिक गाबाचेही पितळ उघड करणार असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात ड्रग्जचा गोरख धंद्याला संरक्षण मिळाले होते, हा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे.

कोण आहे जयदीप राणा -

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री काळात अमृता यांनी नदी संवर्धनासंबंधी सोनू निगमसोबत एक गाणे गायले होते. यात देवेंद्र फडणवीस, अमृता आणि तत्कालिन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनय केल्याचे मलिक म्हणाले. या गाण्याचा फायनान्सर हा जयदीप राणा असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. जयदीप राणा हा ड्रग्ज ट्रॅफिकिंग प्रकरणात सध्या तुरुंगात आहे. अशा ड्रग्ज पेडलरसोबत फडणवीसांचे काय संबंध आहेत, असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला आहे.

नवाब मलिकांनी केले होते ट्वीट -

पत्रकार परिषद घेण्यापूर्वी त्यांनी ट्वीट करत भाजपाचे ड्रग्जशी असलेल्या संबंधावर चर्चा करु, अशा कॅप्शनसह ट्वीट केले होते. त्यासोबतच त्यांनी अमृता फडणवीस यांचा एका व्यक्तीसोबत असलेला फोटोदेखील ट्वीट केला आहे. तो ड्रग्ज पेडलर असल्याचा दावा नवाब मलिकांनी केला आहे.

  • चलो आज BJP और ड्रग्स पेडलर के रिश्तों पे चर्चा करते है pic.twitter.com/FVjbOQ8jvf

    — Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 1, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'अनेकांचा माझ्यावर शांत राहण्यासाठी दबाव' -

नवाब मलिक हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने एनसीबीच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत आहे. तसेच त्यांनी समीर वानखेडेंनी खोट कागदपत्रे देऊन नोकरी मिळवली असून ते जन्मापासून मुस्लीम आहे. त्यांनी खोटी कागदपत्रे देऊन नोकरी मिळवत एका दलित मुलगा किंवा मुलगी हक्क हिरावल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, त्यांनी काल पत्रकारांशी बोलताना आपल्या जीविताला धोका असून अनेकांना शांत राहण्यासाठी दबाव टाकल्याचा गौप्यस्फोटही केला. तर दुसरीकडे समीर वानखेडे आणि त्यांच्या परिवाराने सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. समीर हे हिंदु असल्याचा दावा वानखेडेंच्या परिवाराने केला आहे.

हेही वाचा - 100 कोटी वसुली प्रकरणात CBI कडून पहिली अटक.. आता नवीन खुलासे होण्याची शक्यता

Last Updated : Nov 1, 2021, 9:59 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.