ETV Bharat / city

मालकाचे 8 लाख रुपये चोरणाऱ्या वाहन चालकाला चंदिगड येथून अटक

मालकाचे 8 लाख रुपये चोरी करणाऱ्या वाहन चालकाला पोलिसांनी चंदिगड येथून अटक केली आहे. कांदिवली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अमित राजेश सिंग (वय 28) असून तो पोईसर, कांदिवली परिसरात राहातो.

Amit Singh arrest Kandivali Police
अमित राजेश सिंग अटक कांदिवली पोलीस
author img

By

Published : Apr 2, 2022, 10:13 AM IST

मुंबई - मालकाचे 8 लाख रुपये चोरी करणाऱ्या वाहन चालकाला पोलिसांनी चंदिगड येथून अटक केली आहे. कांदिवली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अमित राजेश सिंग (वय 28) असून तो पोईसर, कांदिवली परिसरात राहातो.

माहिती देताना पोलीस अधिकारी

हेही वाचा - Shipping Record : पहिल्यांदाच जलमार्गाने 51 दशलक्ष टन मालवाहतूक; सागरी महामंडळाचा विक्रम

18 जानेवारीला कांदिवलीच्या हिरानंदानी सोसायटीत राहणाऱ्या व्यावसायिकाने अमित राजेश सिंग नावाच्या वाहन चालकाला कामावर ठेवले. 10 मार्च रोजी व्यावसायिक टिफिन घरीच विसरला. तो आणण्यासाठी व्यावसायिक इमारतीच्या वरच्या मजल्यावर गेला असता त्याचा वाहन चालक अमित सिंग याने गाडी सोसायटीच्या बाहेर नेली आणि मंदिराजवळ ती पार्क करून त्यात ठेवलेले 8 लाख रुपये घेऊन पसार झाला.

कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यातून आरोपी चोरी करून सुरतला, त्यानंतर अयोध्येपासून कोटा आणि त्यानंतर चंदिगडला गेल्याचे समजले. तांत्रिक पुराव्याच्या सहाय्याने पोलीस चंदिगडला पोहचले तेव्हा चोरीच्या पैशातून अमित सिंग तिथे हॉटेल खरेदी करण्याचा बेत आखत होता आणि रोज नवनवीन मुलींशी फ्लर्ट करत असल्याचे समजले. कांदिवली पोलिसांनी अमित सिंगला अटक केली व त्याला मुंबईत आणले. आरोपीने यापूर्वीही अनेक चोऱ्या केल्या असून, त्यांचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा - Ajit Pawar on Gudi Padwa : 'कोरोनामुक्त गुढीपाडवानिमित्त बलशाली महाराष्ट्र घडवण्यास योगदान देऊया'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.