ETV Bharat / city

महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेचा धोका कमी? वाचा काय म्हणाले तज्ज्ञ - Third Wave Information Health Minister Tope

राज्यात सध्यातरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत नाही, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. मात्र, मुंबईसारख्या शहरात नागरिकांमध्ये ८६ टक्के अँटिबॉडीज निर्माण झाल्या आहेत. तसेच, लसीकरण झाल्याने तिसरी लाट येईल आणि जाईल, ही लाट दुसऱ्या लाटेइतकी तीव्र नसेल, अशी माहिती डॉक्टरांसाठी कार्यरत असलेल्या मेडस्केप इंडिया संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सुनीता दुबे यांनी दिली.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Sep 21, 2021, 9:46 PM IST

Updated : Sep 21, 2021, 9:52 PM IST

मुंबई - राज्यात सध्यातरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत नाही, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. मात्र, मुंबईसारख्या शहरात नागरिकांमध्ये ८६ टक्के अँटिबॉडीज निर्माण झाल्या आहेत. तसेच, लसीकरण झाल्याने तिसरी लाट येईल आणि जाईल, ही लाट दुसऱ्या लाटेइतकी तीव्र नसेल, अशी माहिती डॉक्टरांसाठी कार्यरत असलेल्या मेडस्केप इंडिया संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सुनीता दुबे यांनी दिली. तर, पावसाळा व गणेशोत्सवानंतर मुंबईत येणाऱ्या नागरिकांच्या संपर्कात येऊन मुंबईत रुग्णसंख्या वाढू शकते, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

हेही वाचा - फुकट्या प्रवाशांची आता खैर नाही, एसटीची तपासणी मोहीम

तिसऱ्या लाटेचे संकेत नाही

राज्यात गेले दीड वर्ष कोरोनाचा प्रसार आहे. कोरोना विषाणूची दुसरी लाट आटोक्यात आली आहे. त्यामुळे, रुग्णसंख्या ३ ते ५ हजारांवर आली आहे. रुग्णसंख्या आटोक्यात असल्याने सध्यातरी राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मात्र, सणासुदीच्या काळात राज्यात होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ शकते. लसीकरणाची गती वाढवली तर संक्रमण जास्त होणार नाही, असे मतही टोपे यांनी व्यक्त केले आहे.

तरीही कोरोना होऊ शकतो

मुंबईमध्ये गेले दीड वर्ष कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार कमी झाला असून दुसरी लाट ओसरली आहे. मुंबईत सध्या ३०० ते ४०० रुग्ण रोज आढळून येत आहेत. मुंबईत करण्यात आलेल्या पाचव्या सेरो सर्व्हेमध्ये ८६.६४ टक्के नागरिकांमध्ये, तसेच लसीकरण करण्यात आलेल्या ९०.२६ टक्के नागरिकांमध्ये अँटिबॉडीज निर्माण झाल्या आहेत. पावसाळ्यादरम्यान चार महिन्यांत मुंबई आणि राज्याबाहेरील लोक आपल्या गावाकडे जातात. तसेच, गणेशोत्सव असल्याने अनेक चाकरमानी कोकणात गेले आहेत. पावसाळा संपत असल्याने, तसेच गणेशोत्सवानंतर हे सर्व नागरिक मुंबईत यायची सुरुवात होत आहे. हे नागरिक मुंबईत येताना कोरोनाचा प्रसार घेऊन येतात का, यावर आमचे लक्ष आहे. मुंबई बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे सध्या शहरात असलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण होऊ शकते. अँटिबॉडीज असलेले किंवा लस घेतलेले नागरिक कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यास त्यांना विषाणूची लागण होऊ शकते. अँटिबॉडीज असल्या किंवा लस घेतली असली तरी सौम्य लक्षणे येऊ शकतात. यामुळे नागरिकांनी मास्क लावणे, सुरक्षित अंतर राखणे, हात वारंवार स्वच्छ धुणे या नियमांचे पालन करावे, असे आवाहन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केले.

लाटेचा प्रभाव दिसणार नाही

कोरोना विषाणूचे रूप सतत बदलत आहे. विषाणूच्या बदलत्या रुपामुळे कोरोनाची तिसरी लाट येईल. जगभरात अनेक देशात तिसरी लाट आली असून मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. भारतात सध्या रुग्णसंख्या कमी असल्याने तिसऱ्या लाटेचा परिणाम दिसून येत नाही. मुंबईकरांमध्ये अँटिबॉडीज तयार झाल्या आहेत, लसीकरणही चांगले सुरू आहे, यामुळे कमी प्रमाणात रुग्ण आढळून येतील. रुग्णालयात उपचार घ्यावे लागतील अशा रुग्णांची संख्या कमी असेल. घरच्या घरी बरे होतील, अशा रुग्णांची संख्या जास्त असेल. इतर आजार असलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण झाली तर अशा नागरिकांनाच रुग्णालयांत उपचार घेण्याची गरज लागेल. दुसऱ्या लाटेदरम्यान राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने बेड, ऑक्सिजनचे चांगल्या प्रकारे नियोजन केले होते, आताही ते सज्ज आहेत, यामुळे तिसऱ्या लाटेचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून येणार नाही, असे डॉ. सुनीता दुबे यांनी म्हटले.

पालकांनी घाबरू नये

भारतात १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लस दिली जाते. त्या खालील लहान मुलांना लस दिली जात नाही. १२ वर्षांखालील लहान मुलांच्या घशात थायसम नावाचा द्रव असतो, त्यामुळे लहान मुलांमध्ये अँटिबायोटिक निर्माण होते. ताप, सर्दी, खोकला यावरचे औषध दिले तरीही ही लहान मुले लगेच बरी होतात. यामुळे पालकांनी घाबरून जाऊ नये. पालकांनी मुलांची काळजी घ्यावी, असे डॉ. सुनीता दुबे यांनी सांगितले.

८६.६४ टक्के नागरिकांमध्ये अँटिबॉडीज

कोरोना विषाणूचा प्रसार किती नागरिकांमध्ये होऊन गेला आहे ते शोधण्यासाठी सेरो सर्वेक्षण करण्यात येते. मुंबईत आतापर्यंत तीन वेळा सेरो सर्वेक्षण करण्यात आले. एक वेळा लहान मुलांचे सेरो सर्वेक्षण करण्यात आले. १२ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२१ या कालावधीमध्ये महानगरपालिकेने पाचवे सेरो सर्वेक्षण राबवले. पाचव्या सर्वेक्षणानुसार एकूण ८६.६४ टक्के नागरिकांमध्ये अँटिबॉडीजचे अस्तित्व दिसून आले आहे. कोविड लसीकरण झालेल्या नागरिकांपैकी अँटिबॉडीज विकसित झालेल्यांची संख्या ९०.२६ टक्के तर, लसीकरण न झालेल्यांपैकी ७९.८६ टक्के नागरिकांमध्ये अँटिबॉडीज आढळली आहेत. विशेष म्हणजे, मागील सर्वेक्षणांच्या तुलनेत झोपडपट्टी तसेच, बिगर झोपडपट्टी परिसरांमध्ये देखील अँटिबॉडीज विकसित होण्याचे प्रमाण वाढल्याचा निष्कर्षही यातून समोर आला आहे.

हेही वाचा - दुसऱ्या पत्नीशी वाद, पहिल्या पत्नीच्या 4 वर्षांच्या मुलाची सर्वांसमोर आपटून केली हत्या, बघा विदारक VIDEO

Last Updated : Sep 21, 2021, 9:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.