ETV Bharat / city

'परमेश्वराला रिटायर करा' म्हणणाऱ्या 'लमाणाने' अखेर 'पिंजरा' सोडला.... - गिधाडे

रंगभूमीवरील अनभिषिक्त 'नटसम्राट', साहित्यीक, लेखक, दिग्दर्शक डॉ. श्रीराम लागूंचे काल निधन झाले.

Dr Shriram Lagoo
डॉ. श्रीराम लागू
author img

By

Published : Dec 18, 2019, 1:13 PM IST

मुंबई - मागील अनेक दिवसांपासून आजार आणि वृद्धपकाळाशी 'सामना' करत असलेल्या 'नटसम्राट' डॉ. श्रीराम लागूंनी (९२) मंगळवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. अभिनय सृष्टीतील 'सिंहासनावर' तब्बल चार दशक सक्रिय असणाऱ्या या महानायकाला गुरुवारी पुण्यात अखेरचा निरोप देण्यात येणार आहे.

मराठी रंगभूमीवरील तब्बल चार दशकांच्या सक्रीय कालावधील, 'मराठी रंगभूमीच्या स्थित्यंतरांचे' अभ्सासक, 'जबाबदार मराठी रंगभूमी'ची निर्मिती करणारे नट, 'आंधळ्यांची शाळा' असलेल्या सेन्सॉरला 'गणूच्या सदऱ्या' प्रमाणे स्वच्छ करू पाहणारे दिग्दर्शक, 'काचेचा चंद्र' म्हणून प्रसिध्द असलेल्या सिनेमाला 'आविष्कारस्वातंत्र्या'चे 'बुद्धिप्रामाण्य' देणारे अभिनेता, 'गिधाडे' मराठी आणि मराठी रंगभूमीचे लचके तोडत असताना 'वाचिक अभिनय' देणारे अभिजात मराठीचे संवर्धक, म्हणून श्रीराम लागूंचे मराठी अभिनय सृष्टीतील स्थान कायम अढळ असणार आहे.

हेही वाचा - नाट्यसृष्टीतील धगधगतं पर्व शांत झालं - किरण यज्ञोपवीत

जन्म आणि बालपण -

१६ नोव्हेंबर १९२७ ला श्रीराम लागूंचा साताऱ्यात जन्म झाला. आजोबा मामलेदार आणि वडील MBBS डॉक्टर असा लागूंचा संपन्न वारसा. गणित झेपणार नाही अणि कलेत पदवी मिळून प्राध्यापकाच्या पलिकडे नोकरी मिळणार नाही. म्हणून लागूंनी डॉक्टरीचा पेशा निवडला. शाळेतील स्नेहसंमेलनात गोपाळ कृष्ण गोखलेंच्या भूमिकेपासून लागूंनी अभिनय क्षेत्रात पाय ठेवला. पण पहिलाच प्रयोग फसल्यानं पुढील अनेक वर्ष त्यांनी रंगभूमीचा धसका घेतला. पण गजानन जहागिरदारांचं मिर्झा , चंद्रकांत यांचा राम आणि पाटील, बाबूराव पेंढारकरांचा चांभार, शांताराम बापूंचा डॉ. कोटणीस या भूमिकांनी त्यांच्यातील नायकाला स्वस्थ बसू दिले नाही. यानंतर लागूंनी महाविद्यायलात 'भ्रमाचा भोपळा' हे नाटक केलं आणि त्यांच्या रंगकर्मी आयुष्याला सुरुवात झाली.

रंगभूमीवर महानायकाचा उदय -

डॉक्टरीचं शिक्षण(ENT)घेतलेल्या लागूंचे प्रॅक्टीसमध्ये काही मनं रमेना, त्यांच्यातला नायक रंगभूमीच्या स्वगताला अधिन झालेला होता. अशातच त्यांनी डॉक्टरकी सोडून प्राध्यापक वसंत कानेटकारांचे 'इथं ओशाळला मृत्यू' हे पहिले व्यावसायीक नाटक केले. यानंतर 'वेड्याचं घर उन्हात', जगन्नाथांचा रथ', गिधाडे, काचेचा चंद्र, 'आधे अधुरे', 'गार्बो', 'कन्यादान', 'सुंदर मी होणार', 'मित्र', 'नटसम्राट', या नाटकांमधील डॉक्टरांच्या भूमिका विशेष गाजल्या. सोबतच 'सिंहासन', 'सामना', 'पिंजरा' अशा निवडक पण दर्जेदार कथा-पटकथा असलेल्या सिनेमात त्यांच्या भूमिका लक्षणीय ठरल्या. सोबतच त्यांनी 'इन्कांर', 'घरोंदा', 'मुकद्दर का सिकंदर', यासारख्या काही हिंदी सिनेमात देखील काम केले. दरम्यान, घरोंदा या सिनेमातील भूमिकेसाठी त्यांना १९७८ चा फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला.

हेही वाचा - नटसम्राट हरपला, श्रीराम लागूंचा रंगभूमीवरील जीवनप्रवास

लागूंचे सामाजिक जीवन -

रंगभूमीवर वावरणाऱ्या या रंगकर्मीला अभिनयासोबतच लेखन, साहित्य, संगीत, दिग्दर्शनासाठी देखील एक वेगळी ओळख मिळाली. 'परमेश्वराला रिटायर करा' हे त्यांचे परखड मत लोकांच्या पचणी पडले नाही. पण, 'अ‌ॅन अ‌ॅक्टर शुड बी अ‌ॅन अ‌ॅथलीट फिलॉसॉफर' या त्यांच्याचा विचारांना त्यांनी कधीही स्वत: पासून वेगळं केलं नाही. दरम्यान, सामाजिक बांधलकी जपून कृतज्ञता निधी, अंधश्रद्धा निर्मुलण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. दरम्यान, सेन्सॉरशिपला विरोध, अविष्कारस्वातंत्र्य, बुद्धीप्रामाण्यवाद, या मुल्यांना नाटकांची झिंग कधीच चढू दिली नाही.

एक-दोन दशकाच्या नाही तर शतकाचा आणि येणारे हजारो वर्ष अढळ राहणारा 'महानायक' अखेर निर्वतला. लागूंच्या जाण्याने न भरुन निघणारी पोकळी मराठी रंगभूमीवर तयार झाली आहे. तरी, मराठी अन् मराठी रंगभूमीसाठी 'हिमालयाची सावली' असलेल्या 'सूर्य पाहिलेल्या माणसाच्या' महाराष्ट्र कायम ऋणात राहिल हे निश्चीत.

हेही वाचा - 'मराठी रंगभूमीला सुवर्ण काळात आणणाऱ्या दिग्गजांपैकी डॉ. लागू हे एक'

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.