ETV Bharat / city

Job Opportunity: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात नोकरीची संधी, ३४ प्राध्यापकांच्या जागांसाठी सरळ मुलाखत

रायगड जिल्ह्यातील लोणारे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात (Dr. Babasaheb Ambedkar Technical University) 34 प्राध्यापक पदांची भरती होणार आहे. मुलाखती 10, 11 व 12 ऑक्टोबर अश्या सलग तीन दिवस चालणार आहेत.

author img

By

Published : Oct 5, 2022, 5:08 PM IST

Babasaheb Ambedkar Technical University
Babasaheb Ambedkar Technical University

मुंबई: रायगड जिल्ह्यातील लोणारे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात (Dr. Babasaheb Ambedkar Technical University) 34 प्राध्यापक पदांची भरती होणार आहे. पात्र उमेदवारांना सरळ मुलाखतीसाठी जाता येईल. आपले आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊनच मुलाखतीसाठी जावे, अशी सूचना विद्यापीठाने केली आहे.

या पदांसाठी आहेत जागा: विद्यापीठामध्ये रसायनशास्त्राच्या अभियंता पदासाठी सहा जागा, पेट्रोकेमिकल अभियंता 03 जागा, यांत्रिक अभियंता 02 जागा, सिव्हिल इंजिनिअरिंग ०२ जागा, तसेच इलेक्ट्रॉनिक अँड टेली इंजीनियरिंगच्या 09 जागा, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या 08 जागा, कम्प्युटर इंजिनियरच्या 02 जागा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजिनिअर साठी एक जागा, गणित आणि इंग्रजी भाषेसाठीचे प्रत्येकी एक जागा अशा विविध पदांसाठी नोकरीची संधी आहे. उमेदवारांना सरळ मुलाखती साठी आमंत्रित केलेले आहे.

विविध पदांसाठी मुलाखत वेळापत्रक असे असणार: केमिकल इंजिनियर, पेट्रोल केमिकल इंजिनियर आणि मेकॅनिकल इंजिनियर यांच्यातील पदांसाठी 10 ऑक्टोंबर 2022 रोजी सरळ मुलाखत आहे. तर सिव्हिल इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक अँड टेली इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनिअर यांच्यासाठी 11 ऑक्टोबर 2022 रोजी मुलाखत आहे. कम्प्युटर इंजिनियर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजिनियर, गणित आणि इंग्रजी या संदर्भातल्या जागांच्या भरतीसाठी 12 ऑक्टोंबर 2022 रोजी थेट मुलाखत होणार आहे.

शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे: मेकॅनिकल इंजिनियर मेकॅनिकल/ एम एस सी जिओलॉजी प्रथम श्रेणी तसेच पीएचडी त्याच विषयांमध्ये केलेली असावी. शिकवण्याचा, संशोधनाचा आणि औद्योगिक क्षेत्रामधील अनुभव असावा. प्रकाशनाच्या संदर्भातला विविध प्रकारच्या जर्नल मध्ये लिखाण केलेले असावे. दरमहा पगार 30 हजार रुपये असेल. तसेच आवश्यक पात्रता एमएससी /एमए, एम फिल प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण तसेच पीएचडी त्याशिवाय शिक्षण, संशोधन आणि औद्योगिक क्षेत्रात अनुभव आवश्यक आहे. दरमहापगार 30 हजार रुपये असेल.

अधिक माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या खालील संकेतस्थळ आणि संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता.

संपर्क क्रमांक: 02140-275142

मदतीसाठी फोन: 02140-275212
Website: www.dbatu.ac.in
E-mail: registrar@debatu.ac.in

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.