मुंबई - मुंबईतील चैत्यभूमीवर काही वेळेसाठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर आलेल्या अनुयायांना पोलिसांनी रोखल्यानं काही अनुयायी संतापले. या अनुयायांमध्ये आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर (Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din) अभिवादनासाठी रांगेने दर्शन सुरू असताना काही स्टंटबाजांनी मुख्य प्रवेशद्वारातून घुसखोरी केली. त्यामुळे अनुयायांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
हे ही वाचा - Mahaparinirvan Day 2021 : प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनुयायांनी घरूनच केले बाबासाहेबांना अभिवादन
शासनाच्या व्यवस्थेचा आम्ही विरोध करत आहोत. विरोध व्हावा पण चैत्यभूमीच्या बाहेर व्हावा, परंतु अशा पध्दतीने कोणी विरोध करणार असेल तर आम्ही भीम सैनिक सहन करणार नाही. संविधानाच्या विरोधात वागणाऱ्यांवर कारवाई करावी. आम्ही अशा घटनेचे समर्थन करणार नाही, असे रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे आशिष गाडे यांनी सांगितले.