ETV Bharat / city

Chhatrapati Sambhaji Raje समाजाची दिशाभूल करू नये, छत्रपती संभाजी राजेंचा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकाला टोला - Coordinator of Maratha Kranti Morcha

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये मराठा समाजाच्या झालेल्या बैठकीनंतर संभाजी राजे छत्रपती Sambhaji Raje Chhatrapati यांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी टीका Criticism by Coordinator of Maratha Kranti Morcha केली आहे. यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. Chhatrapati Sambhaji Raje reply on social media

Sambhaji Raje Chhatrapati
संभाजी राजे छत्रपती
author img

By

Published : Aug 28, 2022, 12:30 PM IST

Updated : Aug 28, 2022, 12:54 PM IST

मुंबई मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये मराठा समाजाची झालेल्या बैठकीनंतर संभाजी राजे छत्रपती Chhatrapati Sambhaji Raje यांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी टीका केली आहे. संभाजी राजे यांचे नेतृत्व मान्य नाही त्यांनी आपला पक्ष सांभाळावा असे, मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी म्हटले आहे, यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आपले मत व्यक्त केले Sambhajiraje Chhatrapati on Maratha reservation आहे.

मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर समाजाचे नुकसान होऊ नये, यासाठी आम्ही सरकारकडे काही मागण्या केल्या होत्या, त्याकरिता आझाद मैदान येथे मी आमरण उपोषणही केले होते. तत्कालीन नामदार एकनाथ शिंदे यांनी उपोषणस्थळी येऊन जी आश्वासने दिली होती, ती आता मुख्यमंत्री म्हणून नैतिक जबाबदारीने पूर्ण करावीत, असे निवेदन मी त्यांना दिले होते. नियुक्त्यांचा विषय मार्गी लागला, हे त्या उपोषणाचेच यश आहे. समाजाच्या याच मागण्यांकरिता त्यांनी बैठक बोलाविली होती. या बैठकीत सारथी संस्थेची स्वायत्तता, समाजासाठी अनेक योजना असे विषय मार्गी लागले. मात्र काही लोकांनी या बैठकीत शिष्टाचार पाळला नाही. मुद्द्यांवर बोलण्यापेक्षा काही जणांनी भर बैठकीत एकमेकांवरच पातळी सोडून वैयक्तिक टिप्पणी केल्याने मी शांततेचे आवाहन केले. मात्र हा प्रकार वारंवार होत राहिल्याने समाजाच्या मुद्द्यांवर बोलण्यापेक्षा तुमचं हेच चालू राहणार असेल, तर अशा पातळीहीन बैठकीत बसण्यापेक्षा मीच बाहेर जातो, तुमचं चालुद्या, अशी भूमिका मला घ्यावी लागली. मी कधीही कुणाचा आवाज दाबणे शक्य नाही, पण समाजाच्या नावाने उभे राहत असताना पातळीहीन वागून कुणी समाजाची नाचक्की करणार असेल, तर ते मी सहन करू शकत नाही, असे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.

आपले महत्त्व राखण्यासाठी समाजाची दिशाभूल करू नये मराठा आरक्षणाच्या लढ्यात मी काही आज आलेलो नाही. २००७ पासून मी या चळवळीत पूर्णपणे सक्रिय आहे. माझा राजवाडा, घरदार , वैभवसंपन्न जीवनशैली सोडून मी महिनो महिने समाजासाठी राज्यभर फिरत असतो. संसदेत सुद्धा मराठा आरक्षणावर बोलणारा मी पहिला आणि कित्येक वर्षे एकमेव खासदार होतो. संसदेच्या प्रांगणात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारा मी एकमेव व्यक्ती आहे. २०१७ साली मुंबई येथे मोर्चाचा स्टेजवर जाऊन समाजाला दिशा दिली, यामुळे आपले मोठे राजकीय नुकसान होणार याची कल्पना असूनही स्वतःपेक्षा समाजाचा विचार केला.

समाजानेही नेहमीच मला प्रेम दिले आरक्षण रद्द झाल्यानंतर कित्येकांनी समाजाला हिंसक मार्गाला घेऊन जाऊन राजकीय स्वार्थ साधण्याची रणनीती आखली होती. मात्र तेव्हा समाजाला वस्तुस्थिती दाखवून सनदशीर मार्गाने हा लढा पुढे नेला. समाजानेही नेहमीच मला प्रेम, पाठबळ दिले असून कोपर्डीच्या भगिनीला न्याय मिळवून देण्यासाठी सुरू झालेला मराठा क्रांती मोर्चा हा सध्या काही जणांनी कुठे नेऊन ठेवलाय, हे समाज उघड्या डोळ्यांनी बघतो आहे. वेगवेगळ्या पक्षांशी व नेत्यांशी संधान बांधून अनेकांनी वैयक्तिक स्वार्थ साधून घेतले. पाठीशी काहीही कार्यकर्ते अथवा संघटनात्मक ताकद नसताना देखील केवळ समाजाच्या नावावर आपल्या पोळ्या भाजल्या. सत्ताधारी व विरोधी पक्षांतील कित्येक राजकीय नेत्यांनी देखील जाणीवपूर्वक अशा लोकांना खतपाणी घातले व आजही घालत आहेत. पण समाज डोळस आहे. तुम्ही फार काळ समाजाला असे फसवू शकत नाही, केवळ आपले महत्त्व राखण्यासाठी समाजाची दिशाभूल करू नये. असे संभाजीराजेंनी फेसबुक पोस्ट मध्ये महटले आहे.

राजकीय नेत्यांच्या दावणीला बांधलेले लोक म्हणजे समाज नव्हे फेसबुकवर लिहिणारे आणि मीडियावर बोलणारे राजकीय नेत्यांच्या दावणीला बांधलेले काल आलेले मूठभर लोक म्हणजे समाज नव्हे. शेतशिवारात राबणारा शेतकरी, विविध क्षेत्रांत मेहनतीने काम करणारा कष्टकरी, देशाच्या उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न पाहणारा विद्यार्थी आणि या सर्वांचे पालनपोषण करणाऱ्या माझ्या माता भगिनी म्हणजे माझा मराठा समाज आहे. पंधरा वर्षे मी त्यांच्यासोबत राहून, तळागाळात काम करून, समाजासाठी लढा देऊन, स्वतःच्या राजकीय भवितव्यापेक्षा नेहमीच समाजाच्या भल्याचा प्रथम विचार करून त्यांचा विश्वास, प्रेम आणि पाठबळ कमावले आहे, ते कुठल्या स्वयंघोषित नेत्यांमुळे कमी होणार नाही. माझे प्रामाणिक कार्य पाहून कित्येक संघटनांनी, लोकांनी अनेकवेळा माझ्याकडे नेतृत्व दिले, पण कधीही मी हे नेतृत्व स्वतःहून हे स्वीकारले नाही. नेता म्हणून मिरवलो नाही. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शिकवणीप्रमाणे समाजाचा एक सेवक म्हणूनच कार्यरत राहिलो व यापुढेही राहीन. समाजासाठीचा माझा हा लढा मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सुरूच राहील असे, संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. Chhatrapati Sambhaji Raje reply

हेही वाचा दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनात मराठा समाजाचे प्रश्न एका तासात निकाली लागू शकतात , संभाजी राजे

Last Updated : Aug 28, 2022, 12:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.