ETV Bharat / city

लोकांच्या जीवपेक्षा अजेंडा महत्त्वाचा मानू नका, गृहमंत्र्यांचा राजकीय नेत्यांना टोला

वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे गर्दीवर नियंत्रण आसायला हवे. त्या दृष्टीने केंद्र सरकारने सुचना केलेल्या आहेत. मात्र, भाजप आणि मनसेकडून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले जात आहे. राज ठाकरे यांनीही कोरोनाच्या तीसऱ्या लाटेबाबत संशय व्यक्त केला. त्यावर राज ठाकरे यांच्यासह सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी लोकांच्या जीवापेक्षा आपला अजेंडा महत्त्वाचा मानू नये, अशा शब्दांत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सुनावले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
author img

By

Published : Sep 1, 2021, 3:50 PM IST

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीवर नियंत्रण आसायला हवे. त्या दृष्टीने केंद्र सरकारने सुचना केलेल्या आहेत. मात्र, भाजप आणि मनसेकडून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले जात आहे. राज ठाकरे यांनीही पत्रकार परिषदेत कोरोनाच्या लाटेबाबत संशय व्यक्त केला. त्यावर पत्रकारांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारले असता, त्यांनी राज ठाकरे यांच्यासह सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी लोकांच्या जीवापेक्षा आपला अजेंडा महत्त्वाचा मानू नये, अशा शब्दांत सुनावले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील पत्रकारांशी बोलताना

'लोकांच्या जिवापेक्षा आपला अजेंडा मोठा मानू नका'

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. सणासुदीच्या दिवसांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची भीती टास्क फोर्सने वर्तवली आहे. राज्य सरकारने त्याचा सामना करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यानुसार दहीहंडी साजरी करण्यास मनाई करण्यात आली होती. तरीही भाजप आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेत दहीहंडी उत्सव साजरा केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना कोणतीही गोष्ट होऊ नये म्हणून पहिली, दुसरी तिसरी लाट मुद्दाम आणली जात आहे असे म्हटले होते. त्यावर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भाष्य केले आहे. सर्व जगामध्ये आपण जी परिस्थिती पाहत आहेत. तज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे तिसरी लाट येणार आहे. जर तिसरी लाट आली तर त्याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होईल. राजकीय पक्षांना आणि नेत्यांना विनंती आहे की त्यांनी लोकांच्या जिवापेक्षा आपला अजेंडा मोठा मानू नका, यामध्ये सर्वांनी सहकार्य करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

'तात्काळ कारवाईचे आदेश'

ठाण्यात बेकायदेशीर फेरीवाल्यांने सहाय्यक आयुक्त पिंगळे यांच्यावर हल्ला करत दोन बोटे कापली. हा प्रकार गंभीर असून, ठाणे पोलिसांना याबाबत तात्काळ कारवाईचे आदेश वळसे पाटील यांनी यावेळी सांगितले आहे.

'सहकार क्षेत्रातील बदलाचा फटका'

सहकार क्षेत्रातील कायद्यात केंद्र सरकारने बदल केला आहे. राज्याच्या सहकार क्षेत्रात याचे परिणाम सहन करावे लागतील. राज्य सरकारने याबाबत बैठक घेऊन विचार गट स्थापन केला आहे. आवश्यकतेनुसार त्यात सुधारणा करण्यात येतील. आजच्या बैठकीत सादरीकरण केले असून, येत्या तीन महिन्यात बदल होतील, असे प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू असल्याचे गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.