मुंबई- पंजाबमधील गायक सिद्धू मुसेवाला ( Punjab singer Sidhu Musewala ) यांच्या हत्या करणारा आरोपी संतोष जाधव ( Accused Santosh Jadhav ) याचे संबंध डॅडी गॅंगची असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अरुण गवळी याच्या गॅंगची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
कुख्यात डॉन डीडी उर्फ अरुण गवळी ( Don DD alias Arun Gawli ) 80 आणि 90 च्या दहशकात मुंबईतील भायखळा या झोपडपट्टी एरियात राहून घरोघरी दूध पोहोचवण्याचे काम करत होता. पुढे आपल्या क्रुर कृत्यामुळे तो गुन्हेगारी जगताचा बादशाह झाला. आता डॅडी या नावाने त्याची ओळख आहे. नागपूरच्या कारागृहात शिवसेनेच्या नगरसेवकाच्या खून प्रकरणात तो शिक्षा भोगत ( Shiv Sena corporator murder by Gawli ) आहे.
बेरोजगार झाल्यानंतर गुन्हेगारीकडे मोर्चा- गिरणी कामगार गुलाब गवळी यांच्या दोन मुलांपैकी एक, अरुण गवळी यांनी आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात काम करण्यास सुरुवात केली. कारण त्याचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या कमकुवत होते. खटाऊ गिरणीत कामगार म्हणून त्याने आपला प्रवास सुरू केला, परंतु 1970 च्या उत्तरार्धात आणि 1980 च्या दशकाच्या सुरुवातीस जेव्हा गिरणी उद्योगाला संप आणि अखेरीस ताळेबंद मिळू लागले. तेव्हा गवळी आणि त्यांच्यासारखे बरेच लोक बेरोजगार झाले. त्याच सुमारास पारसनाथ पांडे, कुंदन दुबे आणि सलमकर यांच्या नेतृत्वाखाली भायखळा कंपनी होती.
अनेक तरुण गवळीच्या टोळीत सामील-मटका आणि दारूचे अड्डे चालवण्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांचा मुकाबला करण्यासाठी बीआरए टोळी नावाने नवीन टोळी तयार करण्यात आली. त्यात बाबू रेशम, रामा नाईक आणि अरुण गवळी होते. तो बेरोजगार झाल्यानंतर गवळी या टोळीत त्याच्या शालेय मित्रांसह सामील झाला. ज्यामध्ये ते मटका जुगार आणि हफ्ता-वसुलीमध्ये गुंतले होते. गवळीने अखेरीस त्यांच्या दारूच्या अड्ड्यांवर देखरेख केली. हळूहळू मुंबईतील गिरण्या बंद पडल्यावर नोकऱ्या गमावलेले अनेक तरुण गवळीच्या टोळीत सामील होत विश्वासू बनले.
स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन - गवळी हा स्थानिक गुंड असल्याने लवकरच त्याला लोकप्रियता आणि राजकीय पाठबळही मिळू लागले. 80 च्या दशकात शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांनी अरुण गवळी आणि इतरांसारख्या हिंदू गुंडांवर कारवाई केल्याबद्दल मुंबई पोलिसांवर टीका केली होती. तेव्हा त्यांनी त्यांना आमची मुले असे संबोधले होते. मात्र गवळी यांनी 90 च्या दशकात सेनेशी फारकत घेतली होती. त्यांनी ठाकरेंना आव्हान दिले. अरुण गवळीने स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला.
विविध गुन्ह्यांमध्ये सुमारे 40 गुन्हे दाखल- राजकारणी बनणारा तो एकमेव अंडरवर्ल्ड गुंड बनला. सर्व गुंड मुंबईतून पळून जात असताना गवळीने मुंबईतच राहून राज्य करण्याचा निर्णय घेतला. त्याची वारस गीता गवळी या त्यांच्या मतदारसंघातून बृहन्मुंबई महानगरपालिकेत तीन वेळा विद्यमान नगरसेविका आहेत. शिवसेना नेते कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी गवळीला अटक करण्यात आली. अखेरीस त्याला दोषी ठरविण्यात आले. तेव्हा तो विद्यमान आमदार होता. याच गुन्ह्यात हा दाऊद सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्याच्यावर विविध गुन्ह्यांमध्ये सुमारे 40 गुन्हे दाखल आहेत.
दाऊद दुबईत पळून गेल्यावर गवळीचे एकतर्फी राज- 1993 मध्ये जेव्हा मायानगरी मुंबईत बॉम्बस्फोट झाले. तेव्हा अंडरवर्ल्डचे सारे समीकरण बदलून गेले होते. बॉम्बस्फोटाच्या आधीच दाऊद दुबईला पळून गेला. दाऊद आणि छोटा राजन वेगवेगळे झाले. छोटा राजनने आपला मलेशियात व्यवसाय सुरू केला. त्यामुळे अरुण गवळीला मुंबईत आपले साम्राज्य उभे करण्याची संधी मिळाली. सुरुवातीला गवळीचा कारभार दगडी चाळीतून चालत असे. दरम्यान त्याला शेकडो गुंड येऊन मिळाले. तोही अट्टल गुन्हेगार बनला.
इब्राहिम पारकरची शार्प शूटकडून हत्या- मुंबईमध्ये गुन्हेगारी क्षेत्रामध्ये वर्चस्व निर्माण करण्याकरिता अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि डीडी यांनी प्रसिद्ध झालेले अरुण गवळी या दोन्ही गॅंगमध्ये वर्चस्वाच्या लढाईकरिता गॅंग वार देखील झालेला आहे. अरुण गवळीच्या गॅंग यामधील लोकांनी दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरचे पती इब्राहिम पारकरची 1999 मध्ये हत्या केली होती. इब्राहिम पारकर त्याच्या हॉटेलमध्ये असताना गॅंगच्या शार्प शूटरने हत्या केली होती. त्यानंतर दाऊद इब्राहिमच्या शाप शुटरने अरुण गवळीच्या टोळीतील व्यक्तींची जेजे रुग्णालयात उपचार घेत असताना रुग्णालयात घुसून गोळीबार करून हत्या केली होती. तेव्हापासून मुंबई आणि अरुण गवळी गॅंग त्यांच्यामध्ये संघर्षाची लढाई सुरू आहे.
डॉन अरुण गवळीवर निघाला होता सिनेमा-नव्वदच्या दशकात तील अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांच्या जीवनावर मराठी आणि हिंदीमध्ये चित्रपटदेखील काढण्यात आला आहे. अरुण गवळी यांच्या जीवनावर दगडी चाळ नावाने चित्रपट काढण्यात आला आहे. चित्रपटांमध्ये अरुण गवळी कशाप्रकारे डॉन झाला यामधून दाखविण्यात आले आहे. तसेच अरुण गवळी आणि त्यांच्या पत्नी की प्रेम कहानी देखील या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात अरुण गवळी यांची भूमिका अंकुश चौधरी यांनी केली होती.
हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा- अरुण गवळी यांच्या विरोधात खंडणी खून गॅंगवार यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे अरुण गवळी यांना महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या कारागृहांमध्ये ठेवण्यात आले होते. त्यामुळे मुंबईतील आर्थर रोड जेल, पुण्यातील येरवडा, कोल्हापूर, नाशिक आणि सध्या नागपूर येथील कारागृहांमध्ये अरुण गवळी तुरुंगात आहे. अरुण गवळी यांना शिवसेनेचे नगरसेवक यांच्या हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. ती शिक्षा भोगून याकरिता नागपूर कारागृहांमध्ये सध्या अरुण गवळी तुरुंगात आहे.
संतोष जाधव हा गवळी टोळीचा हस्तक-पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या खून प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रातील कुख्यात गुंड अरुण गवळी टोळीशी जोडले गेले आहेत. पंजाब पोलिसांनी उलगडा केलेल्या या प्रकरणात 8 शार्प शूटर्सनी मिळून मुसेवालाची हत्या केल्याचा कयास पोलिसांनी पुराव्यानुसार बांधला आहे. यापैकी संतोष जाधव हा गवळी टोळीचा हस्तक असल्याची माहिती समोर आली आहे. तो पुण्याचा रहिवासी आहे. 29 मे रोजी मुसेवालाच्या शूटिंगमध्येही त्याचा सहभाग होता.
हेही वाचा-पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात डाव्या विचारसरणीचा प्रभाव असलेल्या जिल्ह्यांची संख्या ७० टक्क्यांनी कमी - अमित शाह
हेही वाचा-ONGC: बिहारमध्ये ओएनजीसीने बक्सर येथे पेट्रोलियम साठा असल्याचा अंदाज
हेही वाचा-Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी दिवंगत सिद्धू मूसेवाला यांच्या कुटुंबाचे केले सांत्वन