ETV Bharat / city

महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत मुंबईमधील घरकामगार - Mumbai Latest

लॉकडाऊनच्या काळात समाजाचे लक्ष स्थलांतरित कामगार, तृतीयपंथी आणि देहविक्री करणाऱ्या महिलांकडे वेधले गेले. परंतु एवढ्या मोठ्या घरकामगारांचा वर्ग मात्र सरकार आणि सामाजिक संस्थांच्या नजरेतून दुर्लक्षित राहिला आहे. त्यामुळे शासनाने मदत करावी अशी मागणी त्यांच्यावतीने केली जात आहे.

Domestic workers in Mumbai waiting for financial help from the Government of Maharashtra
महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत मुंबईमधील घरकामगार
author img

By

Published : May 6, 2021, 11:16 AM IST

Updated : May 6, 2021, 8:13 PM IST

मुंबई - कोरोनाचा अनेक घटकांना फटका बसला आहे. आजही काही घटक धोरणाच्या वेढ्यात अडकुन आहे. त्यापैकी एक घटक म्हणजे घरकाम करणार्‍या महिला होय. शहरांमध्ये घरकाम करणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. धुणी-भांडी, साफसफाई, स्वयंपाक असे घरकाम करून लाखो महिला आपला संसार चालवतात. मात्र लॉकडाऊनमुळे घरकाम करणाऱ्या महिलांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे शासनाने मदत करावी, अशी मागणी त्यांच्यावतीने केली जात आहे.

महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत मुंबईमधील घरकामगार

घर कसे चालवावे हा मोठा प्रश्न

लॉकडाऊनच्या काळात काम बंद झाले आहे. लॉकडाऊनच्या काळात कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न घरकामगार महिलांच्या समोर उभा राहीला आहे. त्यात नवर्‍यालाही काम नाही. अनेकांच्या नवर्‍यांना दारूचे व्यसन असल्याने त्रास आणखीनच वाढला. ज्यांच्या पतीचे निधन झालेले आहे, त्यांच्यावर मुलाबाळांची किंवा आई-वडील, सासू-सासरे यांची जबाबदारी होती. यातील 90 टक्के घरकामगार महिलांना स्वतःचे घर नाही, त्यामुळे घरभाडे थकले आहे. काही दिवस आधार दिल्यानंतर किराणा दुकानदारांनी किराणा देणे बंद केले आहे. रेशन कार्ड नसल्याने सरकारी धान्य मिळाले नाही. अशा चौफेर संकटांनी घर कामगार महिला या सध्या घेरलेल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने घरकामगार महिलांना लॉकडाऊनच्या काळात आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती. लॉकडाऊन लागून जवळपास वीस दिवस झालेले आहेत. तरीदेखील शासनाची आर्थिक मदत या महिलांपर्यंत पोहोचलेली नसल्यामुळे, घर कसे चालवावे? हा मोठा प्रश्न सध्या त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे.

बेकारीची कुऱ्हाड

धुणी-भांडी करून आपले घर चालवणाऱ्या महिलांचे आयुष्य कोरोनाच्या संकटाने पुरते उध्वस्त झाले आहे. कोरोनाची स्थिती थोडी निवळ्यानंतरही अनेक घरकाम करणाऱ्या महिलांच्या हातांना काम नाही. तर जे काम आहे, त्यावर घर चालवणेही अवघड झाले आहे. त्यातच आता महाराष्ट्रात दुसऱ्या लॉकडाऊनला सुद्धा सुरुवात झाली आहे. त्यामुळे एकंदरीतच परिस्थितीही अवघड झाली आहे. घरकाम करणाऱ्या सुवर्णा वाघमारे या सांगतात की, गेली दहा वर्षे मी घरकाम करत आहे. पूर्वी घरकाम करत असतांना एकदम व्यवस्थित होते, परंतु आता मला मधुमेह आणि उच्च रक्तदाब असे आजार झाले आहेत. त्यामुळे सध्या मी घरकाम करने सोडलेल आहे. परंतु या लॉकडाउनच्या काळात माझ्यावर देखील बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी

या स्थितीमध्ये सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी घरकाम करणाऱ्या महिलांकडून करण्यात येत आहे. शासनाने या दुसऱ्या लॉकडाऊनच्या काळात घरकाम करणाऱ्या महिलांना आर्थिक पॅकेज घोषित केला आहे. परंतु तो कधीपर्यंत मिळणार यासंदर्भात कोणतीच पुढची तरतूद शासनाकडून झालेली नसल्यामुळे, सध्या घरकाम करणार्‍या महिला अस्वस्थ आहेत.

हेही वाचा - अभिनेता दिलीप ताहीलच्या मुलाला 56 ग्रॅम मेफेड्रोनसह अटक

Last Updated : May 6, 2021, 8:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.