ETV Bharat / city

#DoctorsDay : 'आम्हीच घाबरलो.. तर काम कोण करणार'

महामारीचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर अनेक ठिकाणी खासगी डॉक्टरांनी दवाखाने बंद केले. बऱ्याच ठिकाणी डॉक्टरांनी सेवा खंडित केली. मात्र, विविध ठिकाणी एमबीबीएसच्या अखेरच्या वर्षाला असणारे डॉक्टर विद्यार्थी मदतीला धावले. तसेच अद्याप अनेक डॉक्टर्स अद्याप युद्धभूमीवर कर्तव्य पार पाडत आहेत. आज 'डॉक्टर्स-डे' च्या निमित्ताने डॉ. वेदकुमार घंटाजी या तरुण डॉक्टरचा अनुभव 'ईटीव्ही भारत' प्रकाशित करत आहे.

author img

By

Published : Jul 1, 2020, 3:58 PM IST

doctors day news
आज 'डॉक्टर्स-डे' च्या निमित्ताने डॉ. वेदकुमार घंटाजी या तरुण डॉक्टरचा अनुभव 'ईटीव्ही भारत' प्रकाशित करत आहे.

मुंबई - महामारीचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर अनेक ठिकाणी खासगी डॉक्टरांनी दवाखाने बंद केले. बऱ्याच ठिकाणी डॉक्टरांनी सेवा खंडित केली. मात्र, विविध ठिकाणी एमबीबीएसच्या अखेरच्या वर्षाला असणारे डॉक्टर विद्यार्थी मदतीला धावले. तसेच अद्याप अनेक डॉक्टर्स अद्याप युद्धभूमीवर कर्तव्य पार पाडत आहेत. आज 'डॉक्टर्स-डे' च्या निमित्ताने डॉ. वेदकुमार घंटाजी या तरुण डॉक्टरचा अनुभव ईटीव्ही भारत प्रकाशित करत आहे.

डॉक्टर होण्याचं लहानपनापासूचं स्वप्न पूर्ण झालं. एमबीबीएस झालो, आता इंटर्नशिप करत खऱ्या अर्थाने डॉक्टर म्हणून काम करणार होतो. त्यामुळे खूप उत्साहीत होतो. 1 मार्चला इंटर्न म्हणून जॉईन झालो; आणि दुसऱ्याच दिवशी हातात पत्र पडलं एअरपोर्टवर कोरोना स्क्रिनिंगच्या कामासाठी जायचं. नायर रुग्णालयाच्या आमच्या इंटर्नच्या टीमला हे काम दिलं. सगळे 23-24 वर्षाचे नवखे मुलं. घाबरून काही जणांनी पळ काढला. पण आपण डॉक्टर आहोत, आपणच घबरलो तर रुगसेवेचे काम कोण करणार असे म्हणत याकडे एक संधी म्हणून पहिलं, आणि काम करत राहिलो. अगदी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतरही न घाबरता कोरोनावर मात करत आजच डॉक्टर्स-डे च्या दिवशी पुन्हा कामावर रुजू होतोय. हे माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे, असे डॉ.वेदकुमार घंटाजी म्हणतात.

मूळचा बीडचा असलेल्या वेदने सातवीपासूनच डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं आणि कष्ट-मेहनत करत ते पूर्ण केलं. त्याला एमबीबीएससाठी मुंबईच्या नायर रुग्णालयात प्रवेश मिळाला आणि पाच वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करत तो डॉक्टर झाला. पण आता खऱ्या अर्थाने तो डॉक्टर म्हणून काम करणार होता. एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक वर्ष इंटर्नशिप करावी लागते. तेव्हा हाच काळ असतो तो डॉक्टर म्हणून शिकण्याचा आणि घडण्याचा. त्यानुसार डॉ.वेद आणि त्यासारखे अनेक इंटर्न या नव्या इनिंगसाठी तयार झाले. या वर्षभरात त्यांना खूप काही शिकायचं होत. मात्र कोरोनामुळे डॉ.वेद आणि त्याच्या बॅचची मुलं कोरोनाच्या काळातच इंटर्न म्हणून जॉईन झाले आणि मग कोरोना योद्धा म्हणून काम करू लागले.

डॉक्टर म्हणून नवखे असतानाच समोर इतकी गंभीर परिस्थिती. ही मुलं आणि त्यांच्या घरचेही घाबरले. सर्व सोडून घरी परत या अशी विनवणी ही काही पालक करत होते. पण वेद आणि त्याच्यासारख्या अनेक इंटर्न डॉक्टरांनी याकडे एक संधी म्हणून पाहिले. तर आपण रुग्णसेवेचे व्रत घेतले आहे, ते आपल्याला पूर्ण करावेच लागेल, असे म्हणत कामाला लागलो. आधी एअर पोर्ट मग झोपडपट्ट्यांमध्ये स्क्रिनिंगचे काम. भीती तर खूप वाटत होती. पण नंतर भीती निघून गेली, आणि आता तर नायर रुग्णालयाच्या कोव्हिड वॉर्डमध्ये काम करत असल्याचे डॉ.वेद सांगतो.

रात्रंदिवस न थकता, न घाबरता डॉक्टर्स काम करत आहेत. टेस्ट पॉझिटिव्ह झाल्यानंतर कोरोनावर मात करत पुन्हा कामाला लागत आहेत. डॉ.वेद देखील त्यापैकीच एक. पंधरा दिवसांपूर्वी त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्याची तब्येत गंभीर झाली. पण या कोरोना योद्ध्याने कोरोनाला हरवले. बरे झाल्यानंतर आराम न करता आजच तो कामावर रुजू झाला आहे. डॉ.वेद इंटर्न डॉक्टरांच्या संघटनेचा अध्यक्षही आहे. त्यामुळे त्याच्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत. इंटर्न डॉक्टरांच्या खाण्या-पिण्याच्या-राहण्याच्या समस्येपासून ते कामात येणाऱ्या अडचणी सोडवण्याचे आव्हान त्याच्या समोर असते. हे देखील तो यशस्वीपणे पेलत आहे.

त्याने केलेलं सर्वात मोठं काम म्हणजे इंटर्न डॉक्टरांच्या विद्यावेतनाचा प्रश्न. गेली कित्येक वर्षे इंटर्न डॉक्टर 6 हजारावर काम करत होते. पण डॉ.वेदने पाठपुरावा करत 11 हजार रुपये कायमस्वरुपी विद्यावेतन मिळवून दिले. तर कोव्हिडसाठी काम करणाऱ्या इंटर्न डॉक्टरांना त्यांच्या संघटनेच्या प्रयत्नाने 39 हजार रुपये अतिरिक्त वेतनही मिळू लागले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.