ETV Bharat / city

Dhyandev Wankhede Against Nawab Malik : ज्ञानदेव वानखेडेंची नवाब मलिकांच्या विरोधात पुन्हा मानहानीची याचिका - ज्ञानदेव वानखेडेंची नवाब मलिकांच्या विरोधात याचिका

माजी एनसीबी मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी बुधवार रोजी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात धाव ( Sameer Wankhede's father in Bombay HC ) घेतली असून न्यायालयाच्या आश्वासनानंतरही मंत्री नवाब मलिक हे त्यांच्या कुटुंबाची बदनामी करत आहे. त्यामुळे ज्ञानदेव वानखडे यांनी पुन्हा एकदा नव्याने नवाब मलिकांवर मानहानीचा दावा ( Dhyandev Wankhede files contempt plea against Nawab Malik ) दाखल केला आहे. या वेळी याचिकेत मलिक यांनी 28 डिसेंबर 2021, 2 जानेवारी आणि 3 जानेवारी 2022 रोजी केलेल्या तीन वक्तव्यांचा उल्लेख आहे.

Dhyandev Wankhede Against Nawab Malik
ज्ञानदेव वानखेडे यांची नवाब मलिकांच्या विरोधात मानहानीची मुंबई उच्च न्यायालयात याचिका
author img

By

Published : Jan 20, 2022, 11:39 AM IST

Updated : Jan 20, 2022, 12:22 PM IST

मुंबई - माजी एनसीबी मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी बुधवार रोजी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात धाव ( Sameer Wankhede's father in Bombay HC ) घेतली असून न्यायालयाच्या आश्वासनानंतरही मंत्री नवाब मलिक हे त्यांच्या कुटुंबाची बदनामी करत आहे. त्यामुळे ज्ञानदेव वानखडे यांनी पुन्हा एकदा नव्याने नवाब मलिकांवर मानहानीचा दावा ( Dhyandev Wankhede files contempt plea against Nawab Malik ) दाखल केला आहे. या वेळी याचिकेत मलिक यांनी 28 डिसेंबर 2021, 2 जानेवारी आणि 3 जानेवारी 2022 रोजी केलेल्या तीन वक्तव्यांचा उल्लेख आहे.

'आदेशानंतरही मलिक आपल्या कुटुंबीची बदनामी करत आहेत'

नवाब मलिक आर्यन खानच्या अटकेनंतर रोज पत्रकार परिषदांना संबोधित करत होते आणि ऑक्टोबर महिन्यापासून समीर वानखेडे त्याचे वडील ज्ञानदेव आणि इतरांविरुद्ध सोशल मीडियावर पोस्ट करत होते. ज्ञानदेव यांनी मलिक यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करून मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. प्रदीर्घ सुनावणीनंतर न्यायमूर्ती माधव जामदार यांनी निरीक्षण नोंदवले होते की मलिक हे द्वेषाने ट्वीट करत आहेत. कारण त्यांच्या जावयाला वानखेडे यांनी अटक केली होती. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतरही मलिक आपल्या कुटुंबीची बदनामी करत आहेत. याविरोधात ज्ञानदेव वानखेडे यांनी पुन्हा न्यायालयात दाव घेतली आहे.

बिनशर्त माफी मागावी लागली होती -

खंडपीठाने फटकारल्यानंतर मलिक यांनी काही आठवडे समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात बोलणार नाही असा शब्द दिला होता. परंतु, त्याच कालावधीत डिसेंबर 2021 मध्ये मलिक यांनी काही मीडिया मुलाखतींना संबोधित केले होते आणि त्यावेळी ते वानखेडेंविरोधात बोलले होते. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच मलिकांनी न्यायालयाला दिलेल्या शब्दाचं दोनदा उल्लंघन केल्याचे ज्ञानदेव वानखेडे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर मलिकांना कोर्टाने फटकारले आणि त्यांना बिनशर्त माफी मागावी लागली. वानखेडे यांच्या कुटुंबाबद्दल किंवा पूर्वी जे काही घडले त्याबद्दल बोलणार नाही असे मलिक म्हणाले होते पण वानखेडे हे सार्वजनिक अधिकारी असल्याने मलिक यांना त्यांच्या व्यावसायिक कर्तव्याविषयी बोलण्याचा अधिकार आहे, असे त्यांनी कोर्टात म्हटले होते.

हेही वाचा - Beating a Pregnant Woman : गर्भवती वनरक्षक महिलेस अमानुष मारहाण; सातारा जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

Last Updated : Jan 20, 2022, 12:22 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.