मुंबई - वरील विषयानुसार रा.प. महामंडळातील तृतीय व चतुर्थ वर्ग कर्मचाऱ्यांना कामगार करारात विहीत केलेल्या तरतुदीनुसार शासन
एसटी महामंडळाने दिवाळी बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे. (Diwali bonus announced for ST workers) दिवाळीच्या तोंडावर निर्णय केल्याने कामगारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
[1] ज्या कर्मचाऱ्यांकडे मागील सण उचल बाकी शिल्लक आहे अशा कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यात येवू नये.
[2] अग्रिम वाटपाचे अर्ज आपल्याकडे 19 ऑक्टोबर पर्यंत स्विकारण्यात यावेत. तदनंतर आगार लेखाकार/समयपाल यांनी पडताळणी करून दि. 20 ऑक्टोबर पर्यंत पगाराप्रमाणे एआर तयार करून ठेवण्यात यावेत. अग्रिम वाटपाबाबत मध्यवर्ती कार्यालयाकडून निधी उपलब्ध झाल्यानंतरच अग्रिमाची रक्कम वाटप करण्याविषयी स्वतंत्र सूचना देण्यात येईल त्याशिवाय कोणीही वाटप करू नये, 3) वाटप केलेल्या अग्निमाची माहीती पगार बिलनिहाय कर्मचारी संख्या व वाटपाची रक्कम याची माहीती त्वरीत पाठविणेत यावी. [4] अग्रिमाची वसूली बाबत स्वतंत्र सुचना प्रसारित करण्यात येतील.[5] ज्याकर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती अग्रिम वाटपापासून 10 महिन्याच्या आत असेल अशा कर्मचाऱ्यांना अग्रिम वाटप
करु नये.[6] अग्रिम वाटपासाठी किती रक्कम लागणार आहे व कर्मचारी संख्या याची माहिती दि.20/10/2022 पर्यंत कळविण्यात यावी.
सदरचे परिपत्रक कर्मचाऱ्यांचे अधिक माहितीस्तव नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात यावे, याबाबत कुठलीही कामगार तक्रार उदभवणार नाही. याबाबत काळजी घ्यावी. तसेच विभागीय कार्यालयातील कर्मचारी यांचे अर्ज है शाखा प्रमुख मार्फतच पाठविण्यात यावे. कुठल्याही कर्मचा-यांचा स्वतंत्र अर्ज स्विकारला जाणार नाही याची संबंधितानी नोंद घेण्यात यावी.अशी माहिती 13 ऑक्टोबर 2022 च्या एसटी महामंडळाच्या परिपत्रकात दिली आहे.