ETV Bharat / city

Amit Deshmukh on Disability Certificate : राज्यात दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान विस्तारणार - वैद्यकीय शिक्षण मंत्री - खासदार सुप्रिया सुळे

वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान आणि वैश्विक ओळखपत्र वितरण कार्यक्रम राज्यात राबवला जाणार ( Amit Deshmukh on Disability Certificate ) आहे. याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला.

divyang vyakti asmita abhiyan
वैद्यकीय शिक्षण मंत्री
author img

By

Published : Dec 9, 2021, 6:56 PM IST

मुंबई - राज्यातील दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र तसेच वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान व्यापक स्वरुपात राबविण्यात येणार असल्याची माहिती मुंबईत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज दिली.

वैश्विक ओळखपत्र वितरण कार्यक्रम राज्यात राबवला जाणार -

वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान आणि वैश्विक ओळखपत्र वितरण कार्यक्रम राज्यात राबवला जाणार आहे. याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. दुरदृश्य प्रणालीद्वारे खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्व अधिष्ठाता, दिव्यांग आयुक्तालयाच्या सहायक आयुक्त, आदी उपस्थित होते.

दिव्यांगासाठी प्रमाणपत्र -

दिव्यांग हक्क अधिनियम, 2016 नुसार सर्व 21 प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. त्यामुळे या अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दिव्यांगाना प्रमाणपत्र राज्यभरात विशेष प्रयत्न केले जाणार असून यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग पुरेपुर सहकार्य करेल. राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता याबाबत आवश्यक ती सर्व कार्यवाही करेल, असे मंत्री देशमुख यांनी सांगितले. महाराष्ट्रातील दिव्यांगाना प्रमाणपत्र देण्याकरिता विशेष शिबिरांचे आयोजन करणे आवश्यक असून यासाठी संबंधित विभागाने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हणाल्या.

योजनांचा लाभ मिळणार -

या अभियानामुळे राज्यस्तरावरील दिव्यांगाना विविध वैयक्तिक आणि सामूहिक लाभाच्या योजना कार्यान्वित करणे सोयीचे होईल. तसेच रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी देणे, विविध प्रोत्साहनपर योजहना राबविणे, विविध प्रकारचे साहित्य, साधने आणि उपकरणांचा पुरवठा करणे सोयीचे होणार आहे. याशिवाय दिव्यांग विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती, परीक्षेतील सवलती मिळणे याबरोबरच केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा - Bhima Koregaon case : शहरी नक्षलवादाप्रकरणी अटकेत असलेल्या सुधा भारद्वाज यांची अखेर सुटका

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.