ETV Bharat / city

Bedroll in Rail : रेल्वे प्रवाशांना मिळणार डिस्पोजेबल बेडरोल; पहिल्या टप्यात ४० रेल्वे गाड्यात मिळणार सुविधा - ४० गाड्यांमध्ये डिस्पोजेबल लिनेन

रेल्वे मंत्रालय पहिल्या टप्यात लांब पल्याच्या ४० गाड्यांमध्ये डिस्पोजेबल लिनेन पुरविण्यात येणार आहे. प्रवाशांना हे डिस्पोजेबल लिनेन बेडराेल ( Disposable bedroll for railway passengers )दरात विकत घेता येणार आहे. यासाठी एका खासगी कंपनीची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

डिस्पोजेबल लिनेन
डिस्पोजेबल लिनेन
author img

By

Published : Dec 9, 2021, 8:40 PM IST

मुंबई- पश्चिम रेल्वेने प्रायोगिक तत्वावर लांब पल्ल्याच्या चार रेल्वेमध्ये प्रवाशांसाठी डिस्पोजेबल लिनेन (बेडराेल) देण्याची सुरुवात केली होती. प्रवाशांकडून चांगला प्रतिसदा पाहता मध्य आणि पश्चिम रेल्वे इतरही मेल-एक्स्प्रेस गाड्यातही डिस्पोजेबल लिनेनची सुविधा उपलब्ध करू देणार आहे.

रेल्वे मंत्रालय पहिल्या टप्यात लांब पल्याच्या ४० गाड्यांमध्ये डिस्पोजेबल लिनेन ( disposable linen in 40 railway ) पुरविण्यात येणार आहे. प्रवाशांना हे डिस्पोजेबल लिनेन बेडराेल दरात विकत घेता येणार आहे. यासाठी एका खासगी कंपनीची ( private company appointed to supply linen ) नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा-Ancient Kolhapur Temple Reconstruction : शेकडो वर्षे जुन्या या मंदिराचे का काढले जात आहेत संगमरवर...

खासगी कंपनीची नियुक्ती -

लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील स्लीपर आणि एसी डब्यामध्ये प्रवाशांना बेडरोल आणि ब्लँकेट मोफत देण्यात येत होते. मात्र, गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रवाशांचा सुरक्षेसाठी बेडरोल आणि ब्लँकेटची सुविधा बंद करण्यात आली होती. खबरदारी म्हणून प्रवाशांना रेल्वे प्रवासात आपले बँकेट आपणच सोबत घेऊन यावे, अशा सूचना रेल्वेकडून देण्यात आलेल्या होत्या. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेल्या असून देशभरातील रेल्वे गाड्या नियमितपणे धावू लागल्या आहेत. सध्या हिवाळ्याची सुरुवात झाल्याने रेल्वे प्रवाशांना प्रवासादरम्यान थंडीचा सामना करावा लागत आहे. यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील स्लीपर आणि एसी डब्यामध्ये प्रवाशांना बेडरोलची सुविधा सुरू करा, अशी मागणी प्रवाशांकडून होत होती. त्यानुसार, पश्चिम रेल्वेने प्रायोगिक तत्त्वावर लांब पल्ल्याच्या चार रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांना डिस्पोजेबल लिनेन (बेडराेल) देण्यास सुरुवात केली.

हेही वाचा-Kanhaiya Kumar Criticism of PM : नरेंद्र मोदी हे या देशाची समस्या; काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांची टीका

डिस्पोजेबल बेडरोलमध्ये काय मिळते..?

पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी नितीन डेव्हिड ( West Railway PRO Nitin David on bedroll ) यांनी ईटीव्ही भारतला सांगितले की, सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या ट्रेन क्रमांक १२९५१ मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक १२९५३ ऑगस्ट क्रांती एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक १२९०३ गाेल्डन टेंपल मेल आणि ट्रेन क्रमांक १२९२५ पश्चिम एक्सप्रेसमध्ये डिस्पोजेबल लिनेन (बेडराेल) देण्यात येत आहे. या चार गाड्यांमध्ये बेडरोल किट विकण्यासाठी एका खासगी कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. डिस्पोजेबल बेडरोल प्रवाशांना १५० रुपये प्रति पॅकेट दराने विकले जातात. या किट्समध्ये बेडशीट, ब्लँकेट,कव्हर शीट, उशी, फेस मास्क आणि सॅनिटाझर देण्यात येत आहे. सध्या ही सुविधा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेली आहे.

हेही वाचा-Goa Assembly Election 2022 : गोवा काँग्रेस लवकरच उमेदवारांची यादी जाहीर करणार - पी. चिदंबरम

४० गाड्यांमध्ये मिळणार डिस्पोजेबल बेडरोल-

मध्य रेल्वेवर सीएसएमटी,एलटीटी आणि दादर स्थानकातून सुटणाऱ्या गाड्यांमध्ये बेडराेल दिले जाणार आहेत. संपुर्ण बेडराेडची किंमत ३०० रुपये आहे. परंतु प्रवासी आपल्या साेयीनुसीर बेडराेलमधील वस्तू घेऊ शकतील. ब्लँकेट १८०, बेडशीट ३५, कव्हर शीट ४० आणि कव्हरसहित उशीकरिता ७० रुपये प्रवाशांना माेजावे लागणार आहेत. सध्या मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने डिस्पोजेबल लिनेन सुविधेकरिता निविदा मागविल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.