ETV Bharat / city

ST Workers Strike : बडतर्फ एसटी कर्मचाऱ्यांची संख्या ४४७२ तर आज २५० कर्मचाऱ्यांवर कारवाई! - एकूण एसटी कर्मचारी बडतर्फ संख्या

दोन महिन्यांपासून संपावर ठाम असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना (ST Workers Strike) वारंवार कामावर येण्याचे आवाहन करुन देखील कर्मचारी कामावर येत नसल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांची गैरसोय होत आहे.

st
एसटी बस
author img

By

Published : Jan 19, 2022, 10:12 PM IST

मुंबई - गेल्या दोन महिन्यांपासून संपावर ठाम असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना (ST Workers Strike) वारंवार कामावर येण्याचे आवाहन करुन देखील कर्मचारी कामावर येत नसल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने कारवाईचे सत्र सुरू आहे. आज (19 जानेवारी) महामंडळाने २५० निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले असून, आता बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या ४ हजार ४७२ वर पोहचली आहे. तर आतापर्यत ६ हजार ४३१ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.

४ हजार ४७२ बडतर्फ -

एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या मागणीवरुन सुरु असलेला संपामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. महामंडळाने कामगारांना अंतरिम वेतनवाढ, निलंबन आणि बडतर्फीची कारवाई करूनसुद्धा कर्मचारी आंदोलन मागे घेत नाहीत. या संपावर तोडगा निघावा यासाठी एसटी कृती समितीच्या सदस्यांनी पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे, असे आवाहन केले. मात्र, तरीसुद्धा कर्मचारी संपावर ठाम असल्याने आता महामंडळाची कारवाई जोरदार सुरु आहे. आज २५० कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. एकूण बडतर्फ कर्मचारी संख्या ४ हजार ४७२ झाली आहे. आतापर्यत ११ हजार २४ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच एकूण बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ६ हजार ४३१ झाली आहे.

६५ हजार पेक्षा जास्त कर्मचारी संपात सहभागी -

सध्या ९२ हजार एसटी कर्मचाऱ्यांपैकी फक्त २७ हजार कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले आहेत. उर्वरित ६५ हजार पेक्षा जास्त कर्मचारी संपात सहभागी आहेत. त्यामुळे एसटीचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान होत आहे. याशिवाय ग्रामीण भागातील नागरिकांचीसुद्धा मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.